डिझेल भरणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर ! मिळणार 2 कोटींचे बक्षिस, इंडियन ऑईलकडून मिळतीये संधी

0
27
indian oil customers can get 2 crores rupees prizes under diesel bharo inaam jeeto campaign know about it
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. वाढत्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत असताना आता इंडियन ऑईलकडून आपल्या ग्राहकांना 2 कोटी रुपये जिंकण्याची संधी देत आहे. कंपनीकडून यासंर्दभात ट्विट करून माहिती देण्यात आली.

इंडियन ऑईलने ‘डिझेल भरो, इनाम जितो’ ही ऑफर लाँच केली आहे. या ऑफरअंतर्गत विजेता करोडपती होऊ शकतो. या ऑफरचा फायदा 18 वर्षांवरील ग्राहकांनाच मिळणार असल्याचे सांगितले आहे. इंडियन ऑईलने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, जर इंडियन ऑईलच्या कोणत्याही आउटलेट्सवर किमान 25 लिटरचे डिझेल भरणे गरजेचे आहे. यासाठी कमाल मर्यादा कोणतीही नाही. पण याचे बिलही एकच असायला हवे. इंडियन ऑईलची ही ऑफर 31 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंतच उपलब्ध असणार आहे.

IOCL

तुम्हाला करावा लागेल SMS

25 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त डिझेल घेतल्यानंतर तुम्हाला जे सिंगल प्रिंटेड बिल मिळेल त्यावर बिल नंबर आणि डिलर कोड असेल. त्याला 7799033333 क्रमांकावर SMS पाठवावा.

कोणत्या ग्राहकांना मिळू शकतो फायदा?

SMS DEALER CODE BILL NUMBER QUANTITY to 77990 33333.BSNL, MTNL, VI, एअरटेल किंवा Jio ग्राहक असाल

किती मिळणार बक्षीस

–  4 मेगा विजेत्याला 2 लाख रुपये.

–  16 मासिक विजेत्याला प्रत्येक महिना 75 हजार

–  500 साप्ताहिक विजेता 1000 रुपये प्रत्येक पैसे द्यावे.