Indian Oil देतंय 2 कोटी रूपये जिंकण्याची सुवर्णसंधी ! कोणीही घेऊ शकतं भाग, फक्त हे काम करावं लागेल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जर तुम्ही कोट्यवधी होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी ही संधी देत आहेत. वास्तविक, इंडियन ऑइलच्या रिटेल आउटलेट्सवर डिझेल भरून तुम्ही २ कोटी रुपये जिंकू शकता. होय! Indian Oil एक ऑफर घेऊन आले आहेत. ज्याचे नाव आहे- ”डिझेल भरा, बक्षीस जिंका” इंडियन ऑइलचा या ऑफरचा लाभ १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणारा कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. म्हणजेच यामध्ये १८ वर्ष पूर्ण असणारे नागरिक भाग घेऊ शकतात, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. याची माहिती इंडियन ऑइलने ट्विटद्वारे दिली आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

काय आहे इंडियन ऑइलची ऑफर?

”डिझेल भरा, बक्षीस जिंका” चा भाग बनण्यासाठी इंडियन ऑइलच्या कोणत्याही रिटेल आउटलेट्सवर कमीत कमी २५ लिटर अथवा त्यापेक्षा अधिक डिझेल खरेदी करावे लागेल. अशी अट आहे की याला एकाच बिलमध्ये खरेदी करावे लागेल. म्हणजेच एका वेळेस तुम्हाला २५ लिटर डिझेल खरेदी करावे लागेल. त्याची वेगवेगळी बिले असू नयेत.

येथे SMS करा

२५ लिटर अथवा त्यापेक्षा अधिक डिझेल खरेदी केल्यानंतर तुम्हाला जे सिंगल प्रिंटेट बिल मिळेल, त्यावर एक बिल नंबर आणि डिझेल कोड असेल. त्या कोडला 7799033333 या नंबरवर SMS पाठवावे लागेल.

SMS कसे कराल

मॅसेज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डिझेल कोड टाईप करावा लागेल. त्यानंतर स्पेस देऊन बिल नंबर टाईप करा, त्यानंतर स्पेस देऊन क्वांटिटी टाईप करा आणि 7799033333 क्रमांक पाठवा.

येथे प्रक्रिया पहा

SMS DEALER CODEBILL NUMBERQUANTITY to 7799033333. SMS ची सुविधा BSNL/ MTNL/ VI/ एरटेल/ एयरसेल/ JIO यासहित सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

एका दिवसात फक्त दोनवेळा पाठवू शकता SMS

एका SMS द्वारे तेल खरेदी करून डिटेल्स देऊन तुम्ही इंडियन ऑइलच्या या ऑफरचा हिस्सा होऊ शकता. म्हणजेच तुम्ही २ वेळा एकाच रिटेल आउटलेट्स अथवा वेगवेगळ्या आउटलेट्सवर २५ लिटर अथवा त्यापेक्षा अधिक तेल खरेदी करून SMS पाठवू शकता आणि या योजनेचा भाग बनू शकता. दोन वेळेची गणती एका मोबाईल क्रमांकासाठी आहे.

जाणून घ्या कसा होईल फायदा?

इंडियन ऑइलच्या या ऑफरमध्ये फक्त त्याच ग्राहकांना फायदा मिळेल, जे राज्याच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इंडियन ऑइलच्या रिटेल आउटलेट्सवर प्रिंटेट बिल/ इ-बिलमध्ये २५०० लिटर डिझेल इतके अथवा त्यापेक्षा कमी २५ लिटर खरेदी करत आहेत.

लकी ड्रॉ विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांची लिस्ट

इंडियन ऑइलच्या या खास ऑफरसाठी जे लोक सहभागी होतील, त्यांची निवड लकी ड्रॉद्वारे करण्यात येईल. या ऑफर दरम्यान बक्षिसे आहेत-

A.  ४ मेगा विजेत्यांना २,००,००० रुपये. प्रत्येकाला ही किंमत दिली जाईल.

B.  १६ मासिक विजेत्यांना प्रति महिना ७५,००० रुपये प्रत्येकी दिले जातील.

C.  ७० पंधरवडा विजेत्यांना प्रति पंधरवडा २५,००० रुपये प्रत्येकी दिली जातील.

D.  प्रत्येक आठवड्याला ५०० विजेत्यांना १००० रुपये प्रत्येकी दिले जातील.

३१ जुलै २०२१ पर्यंत आहे ही ऑफर

वेबसाईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइलची ही ऑफर ३१ जुलै २०२१ रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. इंडियन ऑइलने स्पष्ट केले आहे की कोणत्याही कारणाने ग्राहकांनी बिल नंबरला SMS करण्यास सक्षम नसतील तर त्यासाठी इंडियन ऑइल जबाबदार राहणार नाही. यासह हे ही स्पष्ट केले आहे की कोणत्याही कारणाने बिल हरवल्यास अथवा ई-रिसीट डिलिट झाल्यास त्यांचा बक्षिसावरील हक्क नाकारला जाईल. मूळ छापील बिल असणे महत्वाचे आहे.