खुशखबर ! इंडियन ऑईलमध्ये (IOCL) २३० विविध पदांसाठी भरती, डिप्लोमा झालेल्यांना संधी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी २३० जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष व कमाल वय २४ वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. उमेदवाराची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल . परीक्षेत १०० प्रश्न विचारण्यात येतील यासाठी ९० मिनिटांची अवधी देण्यात येईल. अधिक माहिती या संकेतस्थळावर www.iocl.com पहा.

शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा

वयोमर्यादा – किमान वय १८ वर्ष व कमाल वय २४ वर्ष

अर्ज करण्याची मुदत

अर्ज करण्याची तारीख – १८ जुलै २०१९

अर्ज करण्याची अंतिम तारीख – ८ ऑगस्ट २०१९

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

वेबसाईट – www.iocl.com

आरोग्यविषयक वृत्त