Homeआर्थिकUCO, सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ग्राहकांसाठी आवश्यक बातमी, सरकारने घेतला...

UCO, सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ग्राहकांसाठी आवश्यक बातमी, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्रालय सार्वजनिक क्षेत्रातील त्या बँकांमध्ये 14,500 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक पुढील काही दिवसात करेल, ज्या सध्या आरबीआयच्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कच्या अधिपत्याखाली आहेत. अर्थ मंत्रालय प्रामुख्याने आरबीआयच्या पीसीए नियमांच्या अंतर्गत ठेवलेल्या कमजोर बँकांमध्ये पुढील काही दिवसात 14,500 कोटी रुपये टाकू शकते. हा निर्णय बँकांच्या आर्थिक मदतीसाठी घेण्यात आला आहे. इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँक सध्या पीसीए फ्रेमवर्कमध्ये आहेत, ज्यामुळे त्यांच्या अनेक प्रतिबंध लागू आहेत. यामध्ये नवीन कर्ज देणे, व्यवस्थापन भरपाई आणि डायरेक्टर्सचे शुल्क इत्यादीचा समावेश आहे.

नोव्हेंबरमध्ये 5,500 कोटीचे भांडवल टाकले
सूत्रांनी सांगितले की, मंत्रालयाने भांडवल देण्यासाठी बँकांची नावे निश्चित केली आहेत. भांडवल पढील काही दिवसात टाकले जाईल. यामुळे त्या बँकांना लाभ होईल ज्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन अंतर्गत आहेत. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नियामकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 20,000 कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांमधून पंजाब अँड सिंध बँकेत मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये 5,500 कोटी रुपयांची रक्कम टाकण्यात आली होती.

आयडीबीआय बँक सुद्धा पीसीएच्या बाहेर
या आठवड्यात आरबीआयने आयडीबीआय बँकेला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन फ्रेमवर्कच्या बाहेर काढले आहे. या आठवड्यात आयडीबीआय बँकेला आर्थिक कामगिरीत सुधारणेच्या आधारावर सुमारे चार वर्षानंतर आरबीआयच्या पीसीएच्या प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले. आर्थिक स्थिती बिघडण्याच्या कारणामुळे आरबीआयला 2017 मध्ये पीसीए फ्रेमवर्कमध्ये टाकले होते.

पीसीए फ्रेमवर्क काय आहे जाणून घ्या
बँका जेव्हा व्यवसाय करताना आर्थिक संकटात फसतात, तेव्हा त्यांना संकाटातून बाहेर काढण्यासाठी आरबीआय वेळोवळी मार्गदर्शक तत्व जारी करते आणि फ्रेमवर्क बनवते. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन अशाच प्रकारचे फ्रेमवर्क आहे, जे एखाद्या बँकेच्या आर्थिक आरोग्याचे प्रमाण ठरवते. हे फ्रेमवर्क वेळोवळी झालेल्या बदलांसह डिसेंबर 2002 पासून सुरू आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News