‘या’ 3 सरकारी बँकांकडून ग्राहकांसाठी खूशखबर ! आता प्रत्येक महिन्याला होणार EMI वर बचत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या सरकारी बँकांनी त्यांचा ग्राहकांना मोठी खुशखबर दिली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजात ०.०५ टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन दर शुक्रवार पासून लागू झाले आहेत.

बँकेने सांगितल्यानुसार, एका वर्षाच्या मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर ७.२५ टक्क्यांवरुन ७.२० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच एक दिवस आणि एका महिन्याच्या कर्जावर कपात केल्यानंतर व्याजदर कमी करुन ६.७५ टक्के करण्यात आला आहे. इतर सरकारी बँक इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी-इंडियन ओव्हरसीज बँक) यांनी सुद्धा एमसीएलआरमध्ये ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे.

बँकेने कर्जावरील व्याजदर एका वर्षाकरिता ७.६५ टक्क्यांहून ७.५५ टक्के केलं आहे. हा दर गुरुवारपासून लागू करण्यात आला आहे. तसेच युको बँकेने एमसीएलआरमधील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी केलं आहे. त्यानंतर एका वर्षाच्या कर्जावरील दर ७.४० टक्क्यांवरुन ७.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याचं बँकेने निवेदनात नमूद केलं आहे. ही कपात अन्य सर्व मुदतीच्या कर्जावरही लागू असेल.