प्रेमाच्या पीचवर OUT झाला जयदेव उनाडकट, रणजी जिंकून केला ‘साखरपुडा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सौराष्ट्रचा पहिल्या रणजी किताब मिळवून दिल्यानंतर वेगवान गोलंदाज कॅप्टन जयदेव उनाडकट यानं साखरपुडा केला आहे. पोरबंदरच्या या 28 वर्षी गोलंदाजनं आपली मंगेतर रिन्नी हिचे फोटो सोशलवरून शेअर केले आहेत आणि साखरपुड्याची माहिती दिली आहे.

जयदेव उनाडकटनं हार्ट इमोजी आणि एक अंगठीची इमोजी शेअर करत एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यानं म्हटलं की, “6 तास, दोन वेळचं जेवण आणि एक मड केक.”

भारताचा टेस्ट क्रिकेटर आणि त्याचा सौराष्ट्रचा साथी चेतेश्वर पुजारा यानं त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चेतेश्वरनं म्हटलं की, “कुटुंबात स्वागत आहे रिन्नी. मला खूप आनंद आहे की, उनाडकटला त्याच्या आयुष्याचं प्रेम मिळालं आहे.”

पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल, हरफनमौला मनदीप सिंह आणि विदर्भाचा हरफनमौला फैज फजल यांनीही जयदेव उनाडकटला साखरपुड्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जयदेव आणि रिन्नी यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. जयदेव आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी त्यांच्या फोटोंना लाईक केलं आहे. काही चाहत्यांनीही फोटोवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.