कोणत्या देशाचा ‘पासपोर्ट’ सर्वाधिक ‘शक्तीशाली’, कोणत्या स्थानावर आहे ‘भारत’? जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी 2020 साठी जगभरातील विविध देशांचे पासपोर्ट रँकिंग जारी करण्यात आली आहे. या क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेनली पासपोर्ट इंडेक्स जारी केला आहे. या कंपनीकडून सांगण्यात आले की यादीत एकूण 199 विविध देशांचे पासपोर्ट आहेत आणि 227 प्रेक्षनीय स्थळांची नावे आहेत. नवे व्हिसा धोरण लागू झाल्यानंतर त्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.

या यादीत जगातील सर्वात शक्तीशाली देशापासून सर्वात कमकुवत देशांच्या पासपोर्टची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहेत. भारत, पाक, बांग्लादेश, चीन, अफगाणिस्तान या देशाचे नाव कोणत्या स्थानी आहे. याची माहिती या देण्यात आली आहे.

सर्वात शक्तीशाली पासपोर्ट –
हेनली पासपोर्ट इंडेक्स (HPI – Henley Passport Index 2020) नुसार जगभरातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट जपानचा आहे. या यादीत जपान पहिल्या क्रमांकावर आहे. एवढेच नाही तर जपान मागील 3 वर्षांपासून पासपोर्टच्या प्रकरणात पहिल्या स्थानावर आहे. जपानच्या नागरिकांना जगातील 191 जागावर जाण्यासाठी वीजाची आवश्यकता नाही.

देश रॅंक वीजा मुक्त देशांची संख्या
1. जपान 1 191
2. सिंगापूर 2 190
3. दक्षिण कोरिया 3 189
4. जर्मनी 3 189
5. इटली 4 188
6. फिनलॅंड 4 188
7. स्पेन 5 187
8. लग्जमबर्ग 5 187
9 स्वीडन 5 187
10. फ्रांस 6 186
11. स्विट्जरलॅंड 7 185
12. पोर्तुगाल 7 185
13. नेदरलँडस 7 185
14. आयरलँड 7 185
15. ऑस्ट्रिया 7 185
16. अमेरिका 8 184
17. यूके 8 184
18. नॉर्वे 8 184
19. ग्रीस 8 184
20. बेल्जियम 8 184
21. न्यूझीलँड 9 183
22. माल्टा 9 183
23. चेक रिपबल्कि 9 183
24. कॅनडा 9 183
25. ऑस्ट्रेलिया 9 183
26. स्लोवाकिया 10 181
27. लिथुआनिया 10 181
28. हंगेरी 10 181

कोणत्या स्थानावर भारत –
या यादीत भारत 84 व्या स्थानावर आहे. भारतातील नागरिकांना जगभरातील 58 देशात वीजा मुक्त प्रवेश आहे. म्हणजेच या देशात जाण्यासाठी वीजाची आवश्यकता नाही. परंतु यातील एकही देश विकसित नाही. मागील 15 वर्षात भारताची रँकिंग अत्यंत खाली आली आहे.

वर्ष रँक
2006 71
2007 73
2008 75
2009 75
2010 77
2011 78
2012 82
2013 74
2014 76
2015 88
2016 85
2017 87
2018 81
2019 82
2020 84

कोणत्या स्थानावर पाकसह इतर शेजारील देश –
चीन 72
भुतान 89
श्रीलंका 97
बांग्लादेश 98
नेपाळ 101
पाकिस्तान 104
अफगाणिस्तान 107 (शेवटच्या क्रमांकावर)

कशाच्या आधारे निश्चित केली जाते पासपोर्टची रँकिंग –
हेनली पासपोर्ट इंडेक्स या आधारे तयार केला जातो की कोणत्या देशाच्या पासपोर्टला कोणत्या देशात वीजाची आवश्यकता नाही. याशिवाय पर्यटन संबंधित आकडेवारीच्या आधारे देखील ही रँकिंग निश्चित केली जाते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/