Indian players । भारतीय संघाचे खेळाडू यजुर्वेंद्र चहल, कृष्णप्पा गौथम यांना करोनाची लागण

पोलीसनामा ऑनलाइन – इंडिया टीमचे खेळाडू (Indian players) यजुर्वेंद्र चहल (Yajurvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gautham) हे सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मात्र यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम या दोघांना आता कोरोनाची बाधा (Corona positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटव्ह आला आहे. यापूर्वी इंडिया टीमचा खेळाडू (Indian players) कृणाल पंड्याला देखील कोरोनाची बाधा झाली होती. भारताने वनडे मालिका 2-1 ने जिंकली होती. श्रीलंकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि व्हिडिओ विश्लेषक वन-डे मालिका सुरू होण्याआधीच करोना पॉझिटिव्ह आढळले होते. म्हणून ही मालिकाही पुढे ढकलण्यात आली होती.

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंका (Sri Lanka) दौर्‍यावर मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या आहेत. दरम्यान सध्या एका वृत्तानुसार माहिती समोर आली आहे की, यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना कोरोनाची बाधा झाली आहे. टेस्टनंतर या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona positive) आलं आहे. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गौथम, मनीष पांडे, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल हे खेळाडू कृणालच्या संपर्कात आले होते. दरम्यान, भारतीय संघ आज श्रीलंकेहून घरी परतणार आहे. हार्दिक, पृथ्वी, सूर्यकुमार, मनीष, दीपक चहर आणि इशान किशन या खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने टीमसह भारतात परततील.

या दरम्यान, श्रीलंका सरकारच्या (Government of Sri Lanka) नियमानुसार,’ जो खेळाडू पॉझिटिव्ह (Corona positive) येईल त्याला दहा दिवस विलगीकरणात राहावे लागेल.
यानंतर, ते निगेटिव्ह आल्यांनतर देश सोडू शकतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला सात दिवस विलगीकरणात राहावे लागते.
चहल आणि गौथम यांच्या टेस्टचा रिझल्ट आज (शुक्रवारीच) आला आहे.
यामुळे त्यांना पुढील दहा दिवस श्रीलंकेत राहावे लागणार आहे.

Web Title : Indian Players | breaking india cricketer yuzvendra chahal and krishnappa gowtham test positive for covid 19

हे देखील वाचा

Pune Corporation | विकास आराखड्याच्या भूमिकेवर महापौर मोहोळ ठाम ! समाविष्ट गावांचा विकास आराखडा महापालिकेकडेच द्या, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Homeguards | राज्यातील 42 हजार होमगार्डचं मानधन थकलं, सरकारकडून मानधन न मिळाल्यानं आर्थिक संकट

Gold-Silver Price Today | आज उच्चांकी स्तरावरून 7,817 रुपये ‘स्वस्त’ मिळतंय सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव