Indian Post Home Loan | आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून सुद्धा मिळेल होम लोन, जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Post Home Loan | भारतीय पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून (आयपीपीबी) आता होम लोन सुद्धा मिळेल (Indian Post Payment Bank Home Loan). आयपीपीबीने एचडीएफसी (HDFC) सोबत यासाठी भागीदारी केली आहे. यामुळे पेमेंट बँकेच्या जवळपास 4.7 कोटी ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध होईल.

 

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (Indian Post Home Loan) ग्राहकांना एचडीएफसीच्या 650 शाखांचे नेटवर्क आणि 1.36 लाखापेक्षा जास्त बँकिंग अ‍ॅक्सेस पॉईंट (पोस्ट कार्यालय)च्या मदतीने ही सुविधा मिळेल. आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक जे. वेंकटरामु यांनी म्हटले की, आर्थिक समावेशासाठी कर्जापर्यंत संपर्क आवश्यक आहे, कारण ग्राहकांच्या एका महत्वाच्या भागाला कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था कर्ज देत नाहीत.

 

तर एचडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक रेणु सूद कर्नाड यांनी म्हटले की, ही आघाडी सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने एक मोठा प्रवास (Indian Post Home Loan) करणार आहे.

 

प्रमुख बँका आणि त्यांचे व्याजदर :

 

 एचडीएफसी होम लोन – 6.70

 

 आयसीआयसीआय बँक होम लोन – 6.70

 

 स्टेट बँक होम लोन – 6.70

 

होम लोनसाठी आवश्यक कागदपत्रे (Indian Post Home Loan) :

 

 नोकरी करत असाल तर कंपनीचे ओळखपत्र

 

 लोन अ‍ॅप्लिकेशन व्यवस्थित भरा

 

 तीन पासपोर्ट आकाराचे फोटो

 

ओळखपत्रासाठी कागदपत्र :

 

 पॅन कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स / वोटर आयडी कार्ड

 

निवास प्रमाण :

 

 टेलीफोन बिलाची ताजी कॉपी / विजेचे बिल / पाण्याचे बिल / पाईप्ड गॅसचे बिल / ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्डप्रॉपर्टीचे कागद : बांधकामाची परवानगी (जिथे लागू असेल)

 

 रजिस्टर्ड विक्री करारपत्र (महाराष्ट्रात लागू/वाटप पत्र/ स्टॅम्प पेपरवर ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट)

 

 शेयर प्रमाणपत्र (केवल महाराष्ट्रासाठी), देखरेख बिल, विज बिल, संपत्ती, संपत्ती कर रिसिट

 

 स्वीकृत योजनेची कॉपी (झेरॉक्स ब्लूप्रिंट) आणि बिल्डरचा रजिस्टर विकास करार

 

 पेमेंट रिसिट किंवा बँक खात्याची माहिती ज्यामध्ये बिल्डर/विक्रेत्याला केलेल्या सर्व पेमेंटची माहिती असावी.

 

बँक खात्यांची माहिती :

 

 अर्जदाराच्या सर्व बँक खात्यांचे मागील 6 महिन्यांची माहिती

 

 जर दुसर्‍या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्याचे मागील 1 वर्षाचे स्टेटमेंट

 

नोकरदार अर्जदार /सह-अर्जदार/गॅरेंटरसाठी उत्पन्न प्रमाणपत्र :

 

 मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप

 

  2 वर्षांच्या फॉर्म 16 ची कॉपी

 

 मागील 2 आर्थिक वर्षांच्या आयटी रिटर्नची कॉपी

 

बिगर-नोकरदार अर्जदार/सह- अर्जदार/गॅरेंटरसाठी उत्पन्नाचा दाखला :

 

 बिझनेस अ‍ॅड्रेस प्रूफ

 

 मागील 3 वर्षांचे आयटी रिटर्न

 

 मागील 3 वर्षांची बॅलन्स शीट आणि लाभ आणि नुकसान खाते

 

व्यापार लायसन्स माहिती (किंवा समकक्ष)

 

टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16ए, जर लागू असेल)

 

पात्रता प्रमाणपत्र (सी.ए./डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी)

 

Web Title : Indian Post Home Loan | hdfc tie up with india post payments bank to offer home loans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू

PMC Standing Committee | पुणे मनपाच्या स्थायी समितीने आज दिली ‘या’ विषयांना मान्यता; वाचा संपूर्ण यादी

Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या ‘ट्रिक’ने घरबसल्या जाणून घ्या