पोस्टाची जबरदस्त ऑफर : दररोज २०० रुपये वाचवा आणि २१ लाख कमवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. ज्यात दररोज २०० रुपये वाचवून कमवा २१ लाख कमावता येतील. यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते फायदेशीर ठरणार आहे.

अशी आहे योजना –
या योजनेत १०० रुपयांपासून खातं उघडता येते. या खात्याची मर्यादा ही १५ वर्षांची असून या योजनेत संयुक्त खातंही उघडता येते. तसेच या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही मिळते. एका वर्षामध्ये किमान ५०० रुपये गुंतवणूक करणं आवश्यक आहे, तर एका वर्षात एका खात्यात जास्तीत जास्त १.५ लाख गुंतवणूक करू शकता. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी ८ टक्के व्याज मिळते.

पीपीएफ योजनेचे फायदे-
या योजनेत इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट ८०C च्या तरतुदीअंतर्गत करातूनही सूट मिळते. या योजनेंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर प्राप्तिकर लागत नाही. यात नॉमिनी लावण्याची सुविधा मिळते. तसेच तीन वार्षिक वर्षानंतर आपण या खात्यावरून कर्जही घेऊ शकतो.

अशी करा गुंतवणूक –
दररोज २०० रुपयांची पोस्टाच्या योजनेत बचत केल्यास मुदत संपेपर्यंत २१ लाख रुपये मिळतात. दैनंदिन खर्चातील २०० रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास १५ वर्षांनंतर आपल्याला २१ लाख रुपये मिळतात.

असा होईल फायदा –
जर आपण दैनंदिन व्यवहारातील २०० रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास ६ हजार रुपये महिन्याला जमा होतात. अशा प्रकारे वर्षाला ७२००० रुपयांची बचत होते. १५ वर्षांपर्यंत आपली एकूण गुंतवणूक १०. ८० लाख रुपये होईल. पीपीएफवर ८ टक्के वार्षिक व्याज मिळतं. १५ वर्षांपर्यंत आपल्याला या रकमेवर व्याजासकट २१ लाख रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजेच १५ वर्षांसाठी गुंतवलेल्या १०. ३१ लाख रुपयांवर व्याज मिळून २१ लाख रुपये मिळतात.