Indian Post Payment Bank | ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती ! आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) व्यवहारांवर भरावं लागणार अतिरिक्त शुल्क; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Post Payment Bank | भारतीय पोस्ट ऑफिसने (Indian Post) ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमवर (Aadhaar Enabled Payment System-AePS) व्यवहार शुल्क (Transaction Charges) आकारण्याचा निर्णय इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून (Indian Post Payment Bank) घेण्यात आला आहे. याबाबत पोस्ट ऑफिसकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

15 जून 2022 नंतर AePS व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क (Additional Charges) आकारले जाणार आहे. हे अतिरिक्त शुल्क ठराविक व्यवहार मर्यादेनंतर भरावे लागणार आहे. जर तुम्ही एका महिन्यात 3 पर्यंत AePS व्यवहार केले तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. दुसरीकडे, 3 पेक्षा अधिक व्यवहारांवर रोख जमा आणि काढण्यासाठी, तुम्हाला वीस रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क जीएसटीचे शुल्क म्हणून घेतले जाईल. दुसरीकडे, मिनी स्टेटमेंट मिळाल्यावर, तुम्हाला GST म्हणून पाच रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार असल्याचं IPPB ने अधिसूचनेत म्हटले आहे. (Indian Post Payment Bank)

 

नेमकी AePS सेवा काय आहे ?
AePS सेवा ही बँकिंग आधारित मॉडेल सेवा आहे. ज्यामध्ये आधार पडताळणीच्या माध्यमातून ती PoS म्हणजेच Micro ATM च्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार प्रदान करते. हे ग्राहकांना एकूण 6 प्रकारच्या व्यवहारांची सुविधा देते.

 

AePS द्वारे ‘या’ बँकिंग सुविधा उपलब्ध –

मिनी स्टेटमेंट (Mini Statement)

रक्कम जमा करा (Money Deposit)

पैसे काढणे (Money Withdrawal)

शिल्लक चौकशी (Balance Inquiry)

आधार ते आधार निधी हस्तांतरण (Aadhaar Card Cash Transfer)

भीम आधार पे (BHIM Aadhaar Pay)

 

Web Title :- Indian Post Payment Bank | india post payment bank charge will have to be paid on withdrawal through aadhaar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा