Indian Post Recruitment | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! टपाल विभागात 266 पदांवर भरती; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय टपाल विभागात 10 वी पास उमेदवारांना (Indian Post Recruitment) नोकरीची संधी निर्माण झाली आहे. टपाल विभागाने (Indian Post Recruitment) नुकतीच एक भरतीची अधिसूचना जारी केली असून ग्रामीण डाक सेवकाच्या 266 जागा भरण्यात येणार आहे. ही नियुक्ती जम्मू-काश्‍मीर सर्कलसाठी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार @appost.in वर अर्ज करू शकतो. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे. कधी कधी शेवटच्या क्षणी अधिकृत वेबसाइटवर लोड वाढल्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होते. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. दरम्यान, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

अधिसूचनेनुसार या पदांसाठी उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 18 ते 40 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात येईल. यासह यूआर / ओबीसी / ईडब्ल्यूएस पुरुष / ट्रान्समन श्रेणीतील उमेदवारांना या पदासाठी अर्ज शुल्क 100 रुपये तर सर्व महिला / ट्रान्स – महिला उमेदवारांसाठी, सर्व एससी / एसटी उमेदवार आणि सर्व पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्कात सूट आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज फी भरू शकतात. (Indian Post Recruitment)

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकार/ राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित,
स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून अभ्यास केलेले) मध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे.
याशिवाय उमेदवाराने स्थानिक भाषेचा किमान दहावीपर्यंत अभ्यास असणे अनिवार्य आहे.

Web Title :- Indian Post Recruitment | Government job opportunity for 10th pass candidates! Recruitment for 266 posts in Postal Department; Find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Railway Recruitment 2021 | 10 वी पास असणार्‍या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 3366 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रिया

MP Udayanraje Bhosale | खा. उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले – ‘हे तर तुमचं कर्तव्य’

Gold Price | सणासुदीत सुवर्णसंधी? सप्टेंबरमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी उतरलं सोनं