अबब ! ‘या’ विभागानं चक्क भंगार विकून मिळवले 35 हजार कोटी, RTI मध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेने मागील 10 वर्षात भंगार विकून 35,073 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एका RTI ला उत्तर देताना रेल्वेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 10 वर्षात भंगारातून रेल्वेने 35,073 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या माहितीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार 2009-10 ते वर्ष 2018-19 या 10 वर्षांच्या दरम्यान रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून इतके पैसे मिळवले आहेत. या भंगारामध्ये वॅगन्स, कोच आणि रेल्वेच्या रुळांचा समावेश आहे.

या वस्तूंची केली विक्री
माहितीनुसार 2011-12 या वर्षात सर्वात अधिक म्हणजेच 4,409 कोटी रुपयांचे भंगार विकण्यात आले आहे. तर 2016-17 मध्ये सर्वात कमी म्हणजे 2,718 कोटी रुपयांचे भंगार विकण्यात आले आहे. 2009-10 ते 2013-14 पर्यंत 6,885 कोटी रुपयांचे भंगार विकण्यात आले आहे.

तर 2015-16 ते 2018-19 या तीन वर्षांमध्ये 5,053 कोटी रुपयांचे भंगार विकण्यात आले आहे. तर या दहा वर्षांत रेल्वेच्या रुळाच्या विक्रीतून एकूण 11,938 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र मागील पाच वर्षांमध्ये रेल्वेच्या रुळांमध्ये बदल करण्यात न आल्याने ते मोठ्या प्रमाणात विकले गेले नाहीत.

visit : policenama.com