रेल्वेत B.Sc. झालेल्यांना नोकरीची संधी, ८५ जागांवर भरती, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन रेल्वे अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये ८५ जागांवर भरती निघाली आहे. त्यामुळे बीएससी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेइंडियन रेल्वे अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये पर्यवेक्षक पदासाठी ही भरती होत आहे.

IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंगटुरिझम आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचं काम पाहते. त्यामुळे यात पर्यवेक्षक (हॉस्पिटॅलिटी) पदासाठी ८५ जागांवर ही भरती होत आहे. त्यासाठी शिक्षणाची अट असून त्यासाठी उमेदवाराचे बीएससी (हॉस्पिटॅलिटीहॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) मध्ये झालेले असणे आवश्यक आहे. तसंच यात १ वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसंच यावर वयाची अट लागू असून १ जुलै २०१९ पर्यंत ३० वर्षे पूर्ण हवं. तसंच SC/ST वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट तर OBC– वर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली आहे.

दरम्यान, या पदांवर भरती होण्यासाठी या https://majhinaukri.in/irctc-recruitment/  या लिंकचा वापर करावा. तसंच अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारली गेलेली नाही. तसंच या पदाची भरती झाल्यानंतर नोकरीचे ठीकाण देशभरात कोठेही असू शकते.

आरोग्यविषयक वृत्त –