पॅसेंजर ट्रेनचे भाडे वाढवले जात आहे का ? भारतीय रेल्वेने दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना संकटामध्ये बंद असलेली भारतीय रेल्वे (Indian railway) आता देशात सुरळीत होऊ लागली आहे. मात्र, पॅसेंजर ट्रेन अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेल्या नसताना अशी चर्चा आहे की, रेल्वे प्रवासी भाडे वाढवण्यावर विचार करत आहे. यावर स्वत: रेल्वेकडून वक्तव्य आले आहे. एएनआयनुसार, भारतीय रेल्वेने (Indian railway) म्हटले आहे की, मीडियाच्या एका वर्गात ही बातमी देण्यात आली आहे की, प्रवासी भाड्यात काही वाढ होण्याची शक्यता आहे. ही बातमी निराधार आणि तथ्यहीन आहे. भाडेवाढीचे असे कोणतेही प्रकरण विचाराधीन नाही. भारतीय रेल्वेने पुढे म्हटले की, मीडियाला हा सल्ला दिला जात आहे की, त्यांनी अशा बातम्या प्रकाशित करू नये किंवा त्या सर्क्युलेट करू नये.

मागील महिन्यात रेल्वेने म्हटले होते की, सामान्य ट्रेन सेवा सुरळीत होण्याबाबत कोणतीही ठोस तारीख सांगणे शक्य नाही. सोबतच 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये डिसेंबरपर्यंत प्रवाशांकडून होणार्‍या उत्पन्नात 87 टक्के घट नोंदली गेली होती. डिसेंबरमध्ये रेल्वे बोर्डचे अध्यक्ष अध्यक्ष वीके यादव यांनी पत्रकारांना सांगितले होते की, सध्या आर्थिक वर्षात प्रवाशांकडून रेल्वेला प्राप्त झालेला महसूल 4,600 कोटी रुपये आहे. सोबतच अंदाज आहे की, मार्च 2021 पर्यंत ही रक्कम वाढून 15,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकते. 2019 मध्ये रेल्वेला प्रवाशांकडून 53,000 कोटी रूपयांचे उत्पन्न झाले होते. यादव यांनी म्हटले की, प्रवाशांकडून होणार्‍या उत्पन्नात झालेल्या तोट्याची भरपाई माल वाहतुकीतून होणार्‍या उत्पन्नातून होईल.