‘E – Ticket’ व्दारे कमवत होते ‘कोट्यावधी’ रूपये, टेरर फायनान्सशी ‘कनेक्शन’, NIA चा तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने इ तिकीट दलालांच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा केला आहे. आरपीफने अनेक शहरांमध्ये छापेमारी करून यासंबधी 27 जणांना अटक केली आहे. इ तिकिटिंगच्या धंद्यामधून हे लोक प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा कोटी रुपये कमवत होते आणि त्यानंतर याला बिट कॉइन मध्ये बदलण्यात येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार पहिली अटक दहा दिवसांपूर्वी बँगलोर मध्ये करण्यात आली. गुलाम मुस्तफा असे या व्यक्तीचे नाव होते आणि तो इ तिकीट विक्रीचे सॉफ्टवेअर बनवून देत असे. मुस्तफाच्या लॅपटॉपची छाननी केली असता पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सारख्या ठिकाणी त्याच्या लिंक असल्याचे उघड झाले आहे. याबाबतची अधिक तपासणी आयबी,एनआयए, रॉ आणि कर्नाटक पोलीस देखील करत आहेत.

हमीद अश्रफ आहे रॅकेटचा मास्टरमाइंड
गुलाम मुस्तफा झारखंडमधील गिरीडीहचा रहिवासी आहे. पूर्वी तो रेल्वे काऊंटरवर तिकिट ब्लॅक करायचा. नंतर त्याने ई-तिकिट सॉफ्टवेअरची विक्री सुरू केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हामिद अशरफ याच्या मुस्तफा संपर्कात आला आणि या रॅकेटमध्ये सामील झाला. 2016 मध्ये या टोळीचा मुख्य सूत्रधार हमीद अशरफ याला ई-तिकिट सॉफ्टवेअर विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. जामीन झाल्यानंतर तो दुबईमध्ये पळून गेला. हमीद अशरफ यांच्यावरही 2019 मध्ये गोंडा येथील एका शाळेत बॉम्बस्फोटाचा आरोप आहे.

पाकिस्तानातील नंबरशी संपर्क
आरपीएफ कडून मिळालेल्या माहितीनुसार मुस्तफा पाकिस्तानच्या तबलीग-ए-जमातला फॉलो करत होता. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाइल फोन वरून पाकिस्तान, चीन, बांगलादेश अशा देशातील नंबर मिळाले आहेत. ज्यांच्या तो संपर्कामध्ये होता.

फेसबुक पेज लाईक करा –