खुशखबर ! 11.52 लाख रेल्वे कर्मचार्‍यांना मिळालं दिवाळीचं मोठ ‘गिफ्ट’, मिळणार 78 दिवसांचा 2024 कोटींचा ‘बोनस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेअंतर्गत कॅबिनेटने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. ते म्हणाले की रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचे वेतन बोनस म्हणून मिळणार आहे. या बोनसवर सरकार 2024 कोटी रुपये खर्च करणार आहे. या निर्णायाचा फायदा 11.52 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.

रेल्वे विभागात जवळपास 11.52 लाख कर्मचाऱ्यांना दर वर्षी दसऱ्याआधी उत्पादकता आधारित बोनस देण्यात येतो, यामुळे रेल्वेवर 2024 कोटीचे ओझे वाढणार आहे.

2011 – 12, 2012 – 13, 2013 – 14, 2014 – 15, 2016-17, 2018-19 मध्ये देखील रेल्वेने कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने बोनस दिला होता.

दरवर्षी राज्य आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त बोनस देते. असे मानले जात आहे की रेल्वेनंतर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक बोनसची भेट देऊ शकते.

visit : policenama.com

You might also like