Indian Railway Employees | रेल्वे कर्मचार्‍यांच्या भत्त्यात कपातीची तयारी! रेल्वे बोर्ड म्हणालं – ‘खर्च वाढला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेत कर्मचार्‍यांना (Indian Railway Employees) मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. कारण, रेल्वे बोर्डाने सात झोनला ओव्हरटाईम (Overtime), नाईट ड्युटी (Night Duty) आणि प्रवासाशिवाय इंधन आणि मेंटनन्ससाठी मिळणार्‍या भत्त्यांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. (Indian Railway Employees)

 

काय आहे कारण :
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. त्रिपाठी यांना तिमाही आढावा बैठकीत आढळले की, ऑपरेशन्ससंबंधीत खर्च खूप जास्त आहे. चालू आर्थिक वर्षात मेपर्यंत 7 झोनमध्ये हा खर्च रेल्वेच्या मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 26 टक्के सरासरी वाढीने खुप वाढला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन्स खर्चाबाबत 2022-23 चे एकूण बजेट अंदाजे 2.32 लाख कोटी रुपये आहे.
खात्यांचे लेखापरीक्षण होणे बाकी असल्याने, संबंधित आकडे अस्थायी आहेत. (Indian Railway Employees)

 

सूत्रांनी सांगितले की, बैठकीत रेल्वे बोर्डाने झोनला त्यांचा खर्च कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आणि महाव्यवस्थापकांना याबाबत कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. पूर्व रेल्वे (ईआर), दक्षिण रेल्वे (एसआर), उत्तर पूर्व रेल्वे (एनईआर) आणि उत्तर रेल्वे (एनआर) यांसारख्या झोनना किलोमीटर भत्ता नियंत्रित करणे आवश्यक आहे.

 

हा भत्ता ट्रेन संचालित करणार्‍या कर्मचार्‍यांना दिला जातो. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे (एसईसीआर), पूर्व-मध्य रेल्वे
(ईसीआर) आणि पूर्व किनारपट्टी रेल्वे (ईसीओर) यांना नाईट ड्युटी भत्त्यावरील खर्च कमी करण्यास सांगितले आहे.

 

Web Title :- Indian Railway Employees | 7th pay commission railway board seeks to rein in spending on employee allowances fuel maintenance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘हम जेल काट के आय है’ म्हणत गुंडांनी माजविली दहशत ! शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये दोन गटात राडा

 

Pune Crime | मोबाईलचा गैरवापर करुन दुकानदाराने घातला व्यावसायिकाला 12 लाखांना गंडा; उत्तमनगर पोलीस ठाण्यात FIR

 

Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार?