Indian Railway Facility | पाटणाहून जात असाल दिल्लीला तर लखनऊमध्ये उतरा – २ दिवस फिरा आणि पुन्हा प्रवास करा, रेल्वे देते ही जबरदस्त सुविधा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railway Facility | पाटण्याहून दिल्लीला रेल्वेने जाताना तुम्हाला दोन दिवस लखनऊ किंवा कानपूरमध्ये घालवता येतील आणि नंतर त्याच तिकीटावर दिल्लीला जाता येईल. होय हे शक्य आहे. रेल्वेची ही अप्रतिम सुविधा खुप कमी लोकांना माहिती आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांना अनेक अप्रतिम सुविधा दिल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे जर्नी ब्रेक सुविधा (Railways Journey Break Facility) आहे. रेल्वेच्या वेबसाईटनुसार, एखाद्या प्रवाशाने लांब पल्ल्याचे आरक्षण केले, तर त्याला मध्यभागी असलेल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्याची आणि दोन दिवसांत पुन्हा ट्रेन पकडण्याची सुविधा मिळते. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. (Indian Railway Facility)

 

काय आहे प्रवासाचा नियम
जर एखाद्या प्रवाशाचे आरक्षण ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी असेल, तर तो मार्गातील कोणत्याही स्थानकावर उतरून २ दिवसांसाठी जर्नी ब्रेक (Journey Break) करू शकतो. मात्र, प्रवास सुरू झाल्यापासून ५०० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यावरच या सुविधेचा लाभ घेता येईल. जर तुमचे तिकीट १,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी असेल, तर रेल्वे तुम्हाला प्रवासादरम्यान दोनदा जर्नी ब्रेक करण्याची सुविधा देते.

 

कसा घेऊ शकता फायदा
जर एखाद्या प्रवाशाला त्याचा प्रवास मध्यभागी थांबवायचा करायचा असेल आणि दोन दिवसानंतर त्याच तिकिटावर पुढील प्रवास करायचा असेल तर त्याने स्टेशन व्यवस्थापक किंवा तिकीट कलेक्टरला याची माहिती दिली पाहिजे आणि त्यांची परवानगी घेतल्यावरच जर्नी ब्रेक करता येईल. रेल्वेच्या नियमानुसार प्रवाशाला जर्नी ब्रेकचा पूर्ण अधिकार असला तरी याबाबत स्टेशन व्यवस्थापक आणि टीटीई यांना माहिती देणे आवश्यक आहे.

या गाड्यांमध्ये मिळणार नाही सुविधा
१- राजधानी, शताब्दी आणि जनशताब्दी (Rajdhai, Shatabdi and Jan Shatabdi Trains) गाड्यांमध्ये प्रवास करताना प्रवाशांना ही सुविधा दिली जाणार नाही.

२- हे देखील लक्षात ठेवा की तिकिटावर तुमच्या शेवटच्या स्टेशनच्या आधीच्या स्टेशनवर जर्नी ब्रेक सुविधा दिली जाणार नाही.

३- काउंटरवर तिकीट बुक करताना जर्नी ब्रेक करण्याची माहिती द्यावी लागेल. तिकीट बुक केल्यानंतर जर्नी ब्रेक करता येत नाही.

 

Web Title :- Indian Railway Facility | indian railway facility for passengers could break journey on long route train

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल