Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! सप्टेंबरपासून ‘स्वस्त’ होणार AC प्रवास, ‘इथं’ जाणून घ्या

नवी दिल्ली : Indian Railway | रेल्वेने शनिवारी सांगितले की, नवीन वातानुकूलित थ्री टियर इकॉनॉमी श्रेणीचे कोचचे भाडे सध्याच्या थ्री एसी कोचच्या तुलनेत आठ टक्के कमी असेल आणि हे कोच कमी पैशात चांगल्या प्रवासाचा (Indian Railway) आनंद देतील.

अधिकार्‍यांनी सांगितले अशाप्रकारेच 50 कोच विविध झोनमध्ये दिले आहेत. आता भाडे ठरवले असल्याने हे कोच सध्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांना जोडले जातील. ज्या रेल्वेगाड्या जास्त कोचसह धावत आहेत तिथे हे कोच स्लीपर कोचच्या ठिकाणी लावले जातील.

त्यांनी सांगितले की, 300 किलोमीटरपर्यत मूळ भाडे 440 रुपये आहे, जे अंतरानुसार सर्वात कमी आहे. तर सर्वात जास्त मुळ भाडे 4951 किलोमीटर ते 5000 किलोमीटरपर्यत साठी 3065 रुपये आहे.

उत्तर-मध्य रेल्वे झोनला हे कोच दिले आहेत, ज्यांचा वापर रेल्वे क्रमांक 02403 (प्रयागराज-जयपुर एक्सप्रेस) मध्ये सहा सप्टेंबरपासून करेल आणि यासाठी बुकिंग शनिवारपासून सुरू झाली आहे.

अधिकार्‍यांनुसार, खासदारांना जारी पास आणि आमदारांना जारी रेल्वे प्रवास कुपनवर तिकिट
बुकिंग सध्याच्या थ्री एसी कोचच्या तरतुदीनुसार असेल. प्रवासासाठी तिकिट रद्द करणे आणि पैसे परताव्याचे नियम सध्याच्या थ्री एसी कोचनुसार असतील.

नवीन कोचची काही वैशिष्ट्य :

– एसी 3 टियरमध्ये 72 बर्थच्या तुलनेत 83 बर्थ

– आरामशी फायर-प्रूफ बर्थ

– लॅपटॉप / मोबाइल चार्जसाठी सॉकेट

– बर्थमध्ये फ्लाइटप्रमाणे पर्सनल एसी वेंट

– कोचमध्ये दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालय

– टच-फ्री फिटिंगचे बायो-टॉयलेट

– कोचमध्ये पर्सनलाइज्ड रिडिंग लाईट

– मिडल आणि अपर बर्थवर चढण्यासाठी जिना जास्त सुविधाजनक

– प्रत्येक कोचमध्ये टच-फ्री फिटिंगसह मॉड्यूलर बायो-टॉयलेट

हे देखील वाचा

Janmashtami | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

Pune Police | पुण्याच्या कोंढाव्यातील ‘रेश्मा’वर ‘एमपीडीए’ची कारवाई; प्रथमच सराईत महिलेला स्थानबद्ध करुन येरवडा जेलमध्ये पाठवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Indian Railway | good news for rail travellers economy ac 3 tier fare ac travel cheaper september how much distance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update