भारतीय रेल्वेनं बदलला मोठा नियम ! आता ‘इतक्या’ मिनीटांपुर्वी जाहीर होईल ट्रेनच्या तिकीटांच्या आरक्षणाचा चार्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन रेल्वे (Indian Railways) ने प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन रिझर्व्हेशन रूल्समध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेनुसार, आता ट्रेन स्टेशनमधून सूटण्याच्या 30 मिनिट अगोदर दूसरा आरक्षण चार्ट सुद्धा जारी करण्यात येईल. सर्व झोनल रेल्वेकडून आलेल्या विनंतीनुसार भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

प्रथम रिझर्व्हेशन चार्टच्या आधारावर रिकाम्या सीटांसाठी ऑनलाइन आणि पीआरएस काऊंअरवर तिकिट बुकिंग करता यावी, यासाठी हेतून हा बदल करण्यात आला आहे. कोविड-19 मुळे रेल्वेने ट्रेन उघडण्याच्या 2 तास अगोदर दूसरा आरक्षण चार्ट जारी करण्याचा तात्पुरता निर्णय घेतला होता. रेल्वे पहिला आरक्षण चार्ट ट्रेन उघडण्याच्या 4 तास अगोदर जारी करते.

कोरोना संकटात केला होता बदल
केंद्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. सर्व वाहतूक तात्पूरती बंद केली होती. सामान्य दिवसात चालणार्‍या 12 हजारपेक्षा जास्त ट्रेन रद्द केल्या होत्या. भारतीय रेल्वेने अनेक नियम-अटींसह 1 मे च्या नंतर विशेष ट्रेन सुरू केल्या. भारतीय रेल्वेने 11 मे 2020 ला ट्रेनसाठी दुसरा आरक्षण चार्ट जारी करण्याच्या नियमात तात्पुरता बदल केला. या अतंर्गत स्टेशनमधून ट्रेन सुटण्याच्या 2 तास अगोदर दुसरा आरक्षण चार्ट जारी करण्यात येऊ लागला. विशेष ट्रेनसाठी ही तरतूद करण्यात आली होती.

कोरोना काळात अगोदर सामान्य ट्रेनसाठी ट्रेनचे शेड्यूल किंवा री-शेड्यूल डिपार्चरच्या 4 तास अगोदर पहिला आरक्षण चार्ट जारी केला जात होता. तर, दूसरा चार्ट ट्रेन उघडण्याच्या 30 मिनिट ते 5 मिनिट अगोदर जारी केला जात होता. एवढेच नव्हे, रिफंड रूलच्या तरतुदींनुसार बुकिंग झालेल्या तिकिटांना या कालावधीत रद्द सुद्धा करता येत होते. आता पुन्हा एकदा रेल्वे दुसरा तिकिट रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन स्टेशनमूधन सूटण्याच्या 30 मिनिट अगोदर जारी करणार आहे.