Indian railway | आज सुद्धा 174 ट्रेन झाल्या रद्द, घरातून निघण्यापूर्वी आवश्य पहा ट्रेनचे स्टेटस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian railway | जर तुम्हाला आज ट्रेनने प्रवास करायचा असेल तर रेल्वे स्टेशनला जाण्यापूर्वी तुमच्या ट्रेनची स्थिती नक्की तपासा. हे करणे आवश्यक आहे कारण आज म्हणजेच रविवार 7 ऑगस्ट रोजी रेल्वेने 174 गाड्या रद्द केल्या (Cancelled Trains List Today) आहेत. पाऊस आणि देखभालीमुळे रेल्वेला या गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर (Passenger), एक्सप्रेस (Express) आणि मेल गाड्यांचा समावेश आहे. https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर ही माहिती देण्यात आली आहे जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. (Indian railway)

 

174 गाड्या पूर्ण रद्द करण्याव्यतिरिक्त, रेल्वेने 15 गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत, तर 19 गाड्या वळवल्या आहेत. शनिवारीही मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे रेल्वेने 157 गाड्या रद्द केल्या होत्या. अनेक भागात विशेषत: उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत आहे.

 

अशी पहा रद्द झालेल्या गाड्यांची यादी

भारतीय रेल्वेच्या (Indian railway) बहुतांश सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. रेल्वे कॅन्सल, अंशत: रद्द आणि मार्ग वळवलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याशिवाय NTES app वर रद्द झालेल्या गाड्यांची माहितीही घेता येईल.

रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes वेबसाइटवर किंवा IRCTC वेबसाइट https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 can वर जाऊन कोणत्याही ट्रेनची स्थिती तपासता येऊ शकते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरून ट्रेनची स्थिती कशी जाणून घ्या…

रद्द झालेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट द्या.
यावर Exceptional Trains हा पर्याय दिसेल. तो निवडा.
रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांच्या यादीवर क्लिक करा.
येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

 

Web Title : – Indian railway | indian railway news cancelled trains list today 7 august 2022 indian railways latest updates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा