Indian Railway | जर तिकीट आरक्षित नसेल तर फक्त प्लॅटफॉर्म तिकिटावर करता येऊ शकतो प्रवास; जाणून घ्या संपूर्ण माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील लोकांना लांबच्या टप्प्याचा प्रवास करायचा असल्यास पहिला, स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिले जाते. पण अनेकदा ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने जर तुम्हाला कधी अचानक प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण की तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वेमध्ये (Indian Railway) बसू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबद्दल जाणून घ्या…

जर कधी कोणी विना तिकीट प्रवास केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. अनेकजणांवर अशी कारवाई रेल्वे प्रशासन दररोज करत असते. परंतु, तुम्ही वेटिंग तिकिटावर प्रवास करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता प्रवास करताना तिकिटाची गरज भासणार नाही, तुम्ही आता प्लॅटफॉर्म तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता.

 

नवीन नियमानुसार, जर तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी आरक्षण तिकीट नसेल तरीही तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट
घेऊन रेल्वेमध्ये प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला तिकीट तपासनीसाकडे तिकीट मिळवू शकता.
हा नियम (Indian Railways Rules) रेल्वेने नुकताच बनवला आहे.
यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच टीटीईशी संपर्क साधावा लागेल.
त्यानंतर टीटीई तुमच्या उतरायच्या स्थानापर्यंत तिकीट तयार करेल.

ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास, टीटीई तुम्हाला राखीव सीट देण्यास नकार देऊ शकते.
पण, तुम्हाला प्रवास करण्यापासून थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षित तिकीट नसेल,
तर अशा परिस्थितीत 250 रुपये दंड देऊन, प्रवासाचे एकूण भाडे भरून तुम्ही प्रवास करू शकता.

Web Title :- Indian Railway | indian railway rules now travel can be done with platform ticket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ऑनलाईन वाईन मागवणं तरुणीला पडलं महागात, सायबर गुन्हेगारांकडून 1 लाखाचा गंडा; येरवडा परिसरातील घटना

Rajesh Tope | ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये; ही राज्य सरकारची जबाबदारी’ – राजेश टोपे