Indian Railway | IRCTC ची ‘पुशअप’ सुविधा ! 30 टक्के रेल्वे प्रवासी घेताहेत याचा ‘लाभ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Railway | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीकडून (IRCTC) पुशअपची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेनुसार (Indian Railway) आता संबंधित मार्गावर जर एखाद्या रेल्वेत बर्थ शिल्लक असेल तर अशा प्रवाशांच्या मोबाईलवर मेसेज (Message) येणार आहे. या सुविधेला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधारण 30 टक्के प्रवासी याचा लाभ घेत असल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली आहे.

 

आयआरसीटीसीच्या (IRCTC) पाहणीतून याबाबत माहिती समोर आली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीट (Online train tickets) काढताना प्रवासी कोणत्या गाडीत बर्थ शिल्लक आहे हे बघून तिकीट काढत असतात. त्यावेळी त्यांना कधी कन्फर्म बर्थ मिळत असते. तर, कधी प्रतिक्षा करावी लागत असे. मात्र आयआरसीटीसीच्या नव्या सुविधेनूसार आता प्रवाशांना याचा लाभ घेण्यात येणार आहे.

या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना (traveller) कन्फर्म तिकिटासाठी विविध गाड्यांच्या याद्या शोधत बसण्याची आवश्यकता भासणार नाही. ज्या मार्गावर प्रवासी जात आहे. त्या मार्गावरील कोणत्याही एखाद्या गाडीत सीट उपलब्ध असेल, तर त्याचा मेसेज संबंधित प्रवाशाच्या मोबाईलवर येत आहे. त्यासाठी प्रवाशांनी पुशअप नोटिफिकेशनसाठी आपला मोबाइल नंबर रजिस्टर करणे आवश्यक आहे. या क्रमांकावरच मेसेज पाठविण्यात येत आहे. यासाठी कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.

 

समजा, पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट काढत असाल,
तर तुम्हाला त्यावेळी धावणाऱ्या सर्वच गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले असेल,
तर त्यावेळी आपण पुशअप या सुविधेचा पर्याय निवडू शकता.
त्याचबरोबर तुम्ही शोधलेल्या हिस्ट्रीच्या मदतीने त्या मार्गावर धावणाऱ्या कोणत्याही गाडीत सीट उपलब्ध होईल.
दरम्यान, मुंबई आयआरसीटीसीचे (Mumbai IRCTC) जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावला (Pinakin Moravala) यांनी सांगितलं की,
प्रवाशांना या सुविधेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
जवळपास 30 टक्के प्रवाशांनी यासाठी आपले मोबाइल क्रमांक रजिस्टर केले आहे. भविष्यात यात आणखी वाढ होईल.

 

Web Title :- Indian Railway | indian railways 30 train passengers take advantage pushup service IRCTC News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Monalisa | मोनालिसाच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल झाले फोटो

जर 4 लाखात मिळतेय Mahindra Thar, तर कशाला खर्च करायचे 12 लाख; जाणून घ्या सविस्तर ऑफर

Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा