Indian Railway | देशात पहिल्यांदा मातीच्या डोंगराखाली रेल्वे बनवत आहे सर्वात मोठा बोगदा, जाणून घ्या कुठे?

नवी दिल्ली / इम्फाळ : वृत्तसंस्था –  Indian Railway | देशात पहिल्यांदा मातीच्या उंच डोंगराखाली सर्वात जास्त लांबीचा बोगदा बनवला जात आहे. हा बोगदा भारतीय रेल्वेद्वारे इम्फाळला गुवाहाटीसोबत रेल्वेने जोडण्यासाठी बनवला जात आहे. याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 30 टक्के काम लवकरच पूर्ण करून डिसेंबर 2023 पर्यंत या बोगद्यातून रेल्वे धावतील. नॅशनल कॅपिटल कनेक्टिव्हिटी अंतर्गत हे काम केले जात आहे. (Indian Railway)

 

गुवाहाटी आणि इम्फाळ (Guwahati and Imphal) जोडण्यासाठी जिरीबाम ते इम्फाळपर्यंत 111 किमी. लांबीची रेल्वे लाईन
(Jiribam to Imphal long railway tunnel) टाकली जात आहे.
या लाईन दरम्यान छोटे-मोठे मिळून सुमारे 62 किमी. लाईन बोगद्यातून जाईल.
यापैकी सर्वात मोठा बोगदा 10.3 किमी आहे. हा बोगदा बनवण्यासाठी नॉर्थन फ्रंटियर रेल्वे (Northern Frontier Railway) ला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
(Indian Railway)

 

तरीही 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. जिरीबाम ते इम्फाळ रेल्वे प्रोजेक्टचे चीफ इंजिनियर संदीप शर्मा (Sandeep Sharma, Chief Engineer, Jiribam to Imphal Railway Project)
यांनी सांगितले की, 10.3 किमी. पैकी 7.3 किमीचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम सुद्धा लवकरच पूर्ण करून डिसेंबर 2023 पर्यंत ट्रेनचे संचालन सुरू केले जाईल.

त्यांनी सांगितले की, यामध्ये सर्वात मोठे आव्हान मातीच्या 65 मीटर डोंगराखाली बोगदा बनवण्याचे होते.
कारण खोदकामादरम्यान अनेक प्रकारचे गॅस निघण्याची शक्यता असते, सोबतच माती सुद्धा कोसळण्याचा धोका असतो. खुप सावधगिरीने काम केले जाते.

 

चीफ इंजिनियरने सांगितले की, हा बोगदा मातीच्या खाली तयार केलेला सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे.
मात्र देशातील सर्वात लांब बोगदा पीर पंजालमध्ये आहे, ज्यांची लांबी 11.2 किमी आहे.

 

Web Title : Indian Railway | innovation longest tunnel first time in the country under mud mountain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Madhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या मोनोकनीमध्ये जलवा, रिकामे केस आणि मेकअपमध्ये स्टनिंग लुक

Pune Crime | राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी 

Devendra Fadnavis | शिवसेनेसोबत पुन्हा मैत्री करणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टंच सांगितलं…