खुशखबर ! नवरात्रीमध्ये कमाईची ‘सुवर्ण’ संधी देणार IRCTC, घर बसल्या फायदा घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेची सब्सिडियरी IRCTC नवरात्रीत आपले 12.5 टक्के शेअर विकणार आहे. IPO च्या विक्रीच्या माध्यमातून 10 अंक मुल्याचे 2 कोटी शेअर विक्री केले. आयपीओची इश्यू प्राइज 300 रुपये प्रति शेअर असेल. IRCTC ला आशा आहे की यातून ते 600 कोटी रुपये जमावू शकतील. ही शेअरची विक्री SEBI च्या नियामांच्या आधारे होईल. वैयक्तिक म्हणून एक गुंतवणूकदार 2 लाख रुपयांचे शेअर खरेदी करु शकतो. तर फायनान्शिअल इंस्टीट्यूशनला कोणतीही मर्यादा नसेल.
IRCTC चे आधिकृत गुंतवणूक 250 कोटी रुपये आहे, तर त्यांचे पेड अप कॅपिटल 150 कोटी रुपये आहे. IRCTC ने अनेक वर्षांपासून IPO जाहीर करण्याची योजना बनवत होते, परंतू अनेकदा यात अडचणीच येत होत्या. सध्या या कंपन्यांची किंमत जवळपास 7,500 कोटी रुपये आहे.
1999 मध्ये झाली होती IRCTC ची स्थापना
IRCTC ही भारतीय रेल्वेची मिनी रत्न कंपनी आहे. याची स्थापना 1999 साली झाली. त्यानंतर रेल्वे मंत्री नितिश कुमारने IRCTC कडे अनेक जबाबदाऱ्या आणि कामे सोपावली. यात रेलनीर वर IRCTC चा एकाधिकार आहे. यूपीए – 2 च्या दरम्यान ममता बँनर्जी यांनी रेल्वे मंत्री असताना IRCTC ची केटेरिंगची सेवा बंद करुन कंपनीला मोठा धक्का दिला होता.
ई तिकिटावर मिळणारी सर्वात जास्त कमाई ही सर्विस टॅक्स मधून
IRCTC ला मिळणारी कमाई ही सर्वात जास्त ई तिकिटींगवरुन मिळणाऱ्या सर्विस टॅक्सवरुन आहे. नोटाबंदीनंतर 3 वर्षापर्यंत कमाई सोडावी लागली होती आणि सरकारने डिजिटल ट्रांजेक्शनला प्रोस्ताहन देण्यासाठी सर्विस चार्जची वसुली रोखली होती.
हे काम करत आहे आयआरसीटीसी
सध्या ही कंपनी ई तिकिटिंग बरोबर रेल नीर, प्रवासी रेल्वे चालवणे, टूर पॅकेज देणे यासारखे काम करते, परंतू कंपनी या प्रकारच्या पॅकेडवर जो पैसा लावते त्याची पूर्णता वसूली होत नाही.
लखनऊ – नवी दिल्ली आणि मुंबई – अहमदाबाद अशा दोन तेजस एक्सप्रेस रेल्वे IRCTC कडे सोपवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे काम IRCTC कडे पहिल्यांदाच सोपावण्यात आले आहे.
काय आहे IPO
जेव्हा एखादी कंपनी सामान्य लोकांना कंपनीचा हिस्सा विकताना प्रस्ताव ठेवते त्या प्रक्रियेला इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) असे म्हणतात. यानंतर कंपनी स्वत: शेअर बाजारात लिस्ट करुन आपले शेअर गुंतवणूकदारांना विकेल. लिस्टेड झाल्यानंतर कंपनीच्या शेअर खरेदी आणि विक्री करताना शेअर बाजारात करता येते.
कसे करतात IPO मध्ये गुंतवणूक
यात तुम्ही थेट गुंतवणूक करु शकतात. त्यासाठी तुमच्याकडे डिमॉट अकाऊंट असणे आवश्यक आहे. यात ब्रोकरच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकतात. प्रत्येक ब्रोकरेज हाऊस आयपीओमध्ये गुंतवणूकीसाठी आपली वेबसाइटवर वेगवेगळे सेक्शन आहे. ज्यात माहिती भरुन तुम्ही अर्ज करु शकतात. या सूचनेत हे महत्वाचे आहे की तुम्ही किती स्टॉकसाठी किती किंमतीला अर्ज करु इच्छितात. तुमच्या अर्ज नंतर तुमची तेवढी रक्कम आयपीओ बंद झाल्यानंतर लिस्टिंग पर्यंत ब्लॉक करण्यात येईल.
या गोष्टीची काळजी घ्या
चांगला आयपीओ निवडण्याआधी ती कंपनी पहा. अनेक रेटिंग एजेन्सी त्या आयपीओचे रेटिंग देखील देतात ज्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर कंपनीची रेटिंग पॉजिटिव असेल तर गुंतवणूक करणे योग ठरेल. कंपनीच्या चांगल्या व्यवसायासह आयपीओची किंमत देखील जाणून घ्या. ब्रोकर्सच्या रिपोर्टकडे देखील लक्ष द्यावे. बाजार प्रमोटर्स शिवाय इतर गुंतवणूकदारांची देखील माहिती घ्या.
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय