धक्कादायक ! महिन्यातून फक्त एकवेळा धुतलं जातं रेल्वेमध्ये दिलं जाणार ब्लँकेट, RTI मुध्ये खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेच्या वातानुकूलित कोचमध्ये प्रवास करताना मिळालेल्या ब्लँकेटचा आपण कधी ना कधी वापर केलेला असावा. अशा परिस्थितीत ही माहिती भारतीय रेल्वेच्या प्रत्येक प्रवाशाला आश्चर्यचकित करू शकते. वास्तविक, गाड्यांमध्ये प्रवास करताना मिळालेले काळे किंवा तपकिरी जाड ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतले जाते. शिवाय, मुंबई दिल्ली राजधानी आणि ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. या गाड्या नियमितपणे मुंबई ते दिल्ली दरम्यान धावतात. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की या गाड्यांच्या वातानुकूलित कोचमध्ये असलेले हे ब्लँकेट सुमारे 83 हजार किमी प्रवास करून आणि हजारो प्रवाशांचा वापर करूनच झाल्यावरच धुतले जातात.

संबंधित माहिती आरटीआयच्या उत्तरात रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. 64 वर्षीय जतीन देसाई यांनी रेल्वेकडून ही माहिती मागितली होती. प्रवासात ब्लँकेटसह मिळविलेले बेडरोल आणि उशाचे कवच दररोज धुतले जातात आणि प्रवाशांना प्रत्येक वेळी ते फ्रेशच दिले जाते. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी बराच प्रवास करतो आणि बर्‍याच वेळा मला या गाड्यांमध्ये गलिच्छ व फाटलेले ब्लँकेट सापडले आहे. माझा एक मित्र त्याच्या सोबत स्वत:चे ब्लँकेट घेऊन प्रवास करतो. गाड्यांमध्ये दिलेले ब्लँकेट स्वच्छ आहेत की नाही यावर त्याचा विश्वास नाही. या आपल्या देशाच्या प्रीमियम गाड्या आहेत. अशा परिस्थितीत हे ब्लँकेट किती वेळ धुतले हे मला जाणून घ्यायचे होते, म्हणून मी आरटीआय दाखल केला.

पहिल्या दोन महिन्यांत एकदा ब्लँकेट धुतली गेली ! :
देसाईंच्या आरटीआयला मिळालेल्या उत्तरात, लिनेनवाल्या गोष्टी प्रत्येक वेळी वापरानंतर धुतल्या जातात. त्याच वेळी, ब्लँकेट्स महिन्यातून एकदा धुतले जाते. सीपीआरओ रवींदर भाखर यांच्या म्हणण्यानुसार, ब्लँकेट्स लोकरयुक्त असतात आणि जास्तीत जास्त 50 वेळा धुण्यास योग्य असतात. पूर्वी, हे ब्लँकेट प्रत्येक दोन महिन्यांत एकदा धुतले जात होते, परंतु आता काही काळापूर्वी आता ते दरमहा धुतले जाऊ लागले आहे.

दरम्यान, रेल्वे आता दर दोन वर्षांनी ही ब्लँकेट बदलते. यापूर्वी हे ब्लँकेट चार वर्षे वापरल्यानंतरच काढण्यात येत होते. या प्रीमियम गाड्यांच्या पहिल्या श्रेणी मध्ये ब्लँकेटसह कव्हर देखील उपलब्ध आहे. इतर श्रेणींमधील प्रवाशांना आधीपासून वापरलेले ब्लँकेट घ्यावे लागते.