Indian Railway Job Recruitment | बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बारावी पास असलेल्या तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची (Indian Railway Job Recruitment) संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण रेल्वेकडून विविध स्पर्टस कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार दक्षिण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज दाखल करू (Indian Railway Job Recruitment) शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी 2023 आहे.

एकूण 21 जागांसाठी भरती

क्लास 7 सीपीसी पे मेट्रिक लेव्हल 4/5 – 5 जागा
क्लास 7 सीपीसी पे मेट्रिक लेव्हल 2/3 – 16 जागा

अशा एकूण 21 जागांसाठी भरती होणार आहे.  

पात्रता

लेव्हल 2/3 आणि लेव्हल 4/5 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत

या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास 3 डिसेंबर 2022 पासून सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांनी 3 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेटे आणि लाहौल, स्पिती जिल्हे या ठिकाणांहून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी 2023 आहे.

भरती शुल्क

या भरतीसाठी शुल्क देखील आकारण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. आरक्षित कोट्यातील उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे, तर इतर उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

वेतन

लेव्हल 2 – 19, 900
लेव्हल 3 – 21, 700
(Leval) लेव्हल 4 – 25, 500
लेव्हल 5 – 29, 200

Web Title :- Indian Railway Job Recruitment | jobs official notification check application date government Indian Railway Job Recruitment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CBI Raid | राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे सीबीआयकडून चौकशी

Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल