Railway Jobs : रेल्वेमध्ये 3 लाखाहून अधिक ‘पदं’, सरकारनं दिली भरती प्रक्रियाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी मोठी भरती प्रकिया रेल्वेकडून राबवण्यात आली आहे. रेल्वेभरतीत थोडी थोडकी नाही तर जवळपास 3 लाख पदांवर बंपर भरती राबवली जात आहे. आता यातील हजारो पदांवर अर्ज प्रकिया राबवली जाणार आहे. रेल्वे भरती बोर्डद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

आता या संबंधित माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी संपूर्ण माहिती दिली. शुक्रवारी राज्यसभेत एका लिखित उत्तरात पीयूष गोयल यांनी सांगितले की भारतीय रेल्वेमध्ये एकूण स्वीकृत पदांची संख्या 15,24,127 आहे. यात 12,17,900 पद पहिल्यांपासून भरली गेली आहेत, तर 3,06,227 पदांची संख्या रिक्त आहेत. यात जवळपास 2.94 लाख रिक्त पदांवर भरती प्रक्रिया रेल्वेद्वारे भरली जाणार आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी राज्यसभेत माहिती दिली की 2.94 लाख पद भरण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाद्वारे सात अधिसूचना जारी करण्यात आली. ज्याची अर्ज प्रक्रिया आणि भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. चार अधिसूचना अशा आहेत, ज्यावर भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अंतर्गत 90,890 निवड झालेल्या उमेदवारांनी कार्यभार ग्रहण केला आहे, किंवा लवकरात लवकर स्वीकारतील. याशिवाय 601 राजपत्रित पदांवर नियुक्त्यांसाठी संघ लोकसेवा आयोगाकडून मागणीपत्र पाठवण्यात आले आहेत. यातील 200 पद ही डॉक्टर पदासाठी आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली की 2020 आणि 2021 मध्ये रेल्वेमध्ये काही पद रिक्त होतील. ही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होतील. 2019 – 20 मध्ये एकूण 47 हजार रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त होतील. तर 2020-21 मध्ये जवळपास 41 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतील. म्हणजेच 2021 पर्यंत रेल्वेमध्ये जवळपास 1 लाख पद रिक्त होतील.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like