Railway नं लॉन्च केलं एक खास App ! मिळणार रेल्वे तिकीट, वेळ आणि इतर सर्व माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने एक नवीन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेनशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वेने समग्र अ‍ॅप (Samagra App) तयार केले आहे. हे Android फोनमध्ये विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला रेल्वे, स्थानक सुविधा, रेल्वे धोरण, तिकिटे, सवलत यासंबंधित संपूर्ण माहिती मिळेल.

गाड्यांची ये-जा आणि आरक्षणाची माहिती घरबसल्या मिळणार
जनरल मॅनेजर एलसी त्रिवेदी यांनी पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केला. ते म्हणाले की, या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बर्‍याच सुविधांची माहिती मिळेल. गाड्यांची ये-जा आणि आरक्षणासारखी सर्व माहिती घरबसल्या मिळेल. हे अ‍ॅप समस्तीपूर झोनमध्ये तयार केले गेले आहे. ज्यामध्ये डीसीएम प्रसून कुमार आणि टीआरएफ तंत्रज्ञ यांचे खूप सहकार्य लाभले आहे.

या गोष्टींसाठी मिळणार मदत
या अ‍ॅपद्वारे कोणताही प्रवासी झोनमधील कोणत्याही स्थानकात उपस्थित प्रवासी सुविधांसह अन्य महत्वाची माहिती घेऊ शकतो. या अ‍ॅपचा फायदा प्रवाशांना तसेच रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या कर्मचार्‍यांना देखील मिळू शकतो. तसेच तिकिट तपासणी, बुकिंग, आरक्षण इत्यादी विभागदेखील आपला रिपोर्ट बनवण्यासाठी या अ‍ॅपची मदत घेऊ शकतात.