Indian Railway New Facility | प्रवाशांसाठी खुशखबर ! जनरल तिकिटावर करू शकता स्लीपर कोचमध्ये प्रवास, लागणार नाही एक्स्ट्रा चार्ज

नवी दिल्ली : Indian Railway New Facility | जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा देण्याचा विचार भारतीय रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वे बोर्डाने विभागीय प्रशासनाकडून रिपोर्ट मागवला आहे. हिवाळ्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या सुविधेची विशेष बाब म्हणजे प्रवाशांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. रेल्वेचा हा निर्णय ज्येष्ठ आणि गरीबांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता स्लीपर क्लासमध्ये प्रवास करता येणार आहे (Indian Railway New Facility).

एसी कोचची वाढती संख्या

कडाक्याच्या थंडीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. हिवाळ्यात रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी एसी कोचने प्रवास करणे पसंत करतात. या कारणास्तव रेल्वेने काही गाड्यांमध्ये एसी डब्यांची संख्या वाढवली आहे. काही गाड्यांमध्ये एसी कोच हे स्लीपर कोचच्या इतकेच असतात. एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांमुळे स्लीपर कोचच्या सीट रिकाम्या जात आहेत. (Indian Railway New Facility)

जनरल क्लासमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली

त्याचबरोबर नरल क्लासमध्ये प्रवाशांची संख्याही वाढत आहे. ज्या ट्रेनमध्ये बहुतेक स्लीपर सीट रिकाम्या आहेत त्या ट्रेन्सवर रेल्वे विचार करत आहे. त्यातील काही स्लीपर कोचचे रूपांतर जनरल कोचमध्ये केले जाणार आहे. या डब्यांवर अनारक्षित लिहिलेले असेल आणि ते इतर स्लीपर कोचशी जोडले जातील. मात्र, या डब्यांमधील दरवाजे बंद असतील, जेणेकरून कोणीही जनरलमधून स्लीपर कोचमध्ये जाऊ शकणार नाही.

रेल्वे बोर्डाने मागवला रिपोर्ट

भारतीय रेल्वे बोर्डाच्या सर्व विभागीय प्रशासनाकडून रिपोर्ट मागवण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने स्लीपर सीट ८० टक्के रिकाम्या असलेल्या ट्रेनचा तपशील मागवला आहे.
रेल्वे या सर्व गाड्यांच्या रिकाम्या स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यांमध्ये करणार आहे,
जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.

Web Title :- Indian Railway New Facility | indian railway general ticket passengers will travel in sleeper coach without extra fee know new facility

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्यावर ED च्या छापेमारीबाबत बोलले किरीट सोमय्या; म्हणाले…

Hasan Mushrif ED Raid | ईडीच्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी