Indian Railway New Guidelines | प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘इथं’ रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी नवीन गाइडलाइन जरूर वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railway New Guidelines | कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरियंट, ओमिक्रॉनमुळे सर्व प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. कुठे वीकेंड कर्फ्यू तर कुठे रात्रीचा कर्फ्यू लोकांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नवीन नियम (Indian Railway New Guidelines) करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या कोरोनामुळे रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये (tamilnadu) दक्षिण रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष नियम बनवला आहे. चेन्नईच्या (chennai) लोकल ट्रेनमध्ये फक्त तेच प्रवासी प्रवास करू शकतात ज्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एक लस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रेल्वेने सांगितले की, 10 जानेवारी नंतर, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तेच लोक ट्रेनने प्रवास करू शकतात.

 

तसेच ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत. त्यांना ट्रेनमध्ये प्रवास करता येणार नाही. मात्र, अशी गाइडलाइन आतापर्यंत केवळ दक्षिण रेल्वेने (southern railway) घोषित केले आहे.

 

 

500 रुपये दंड भरावा लागेल.
तसेच, दक्षिण रेल्वेच्या नवीन गाइडलाइन नुसार (Indian Railway New Guidelines), रेल्वेच्या आवारात मास्क न लावणाऱ्या प्रवाशांनाही 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.
तामिळनाडूमध्ये कोरोनाची वाढते प्रमाण पाहता रेल्वे विभागाने नवीन गाइडलाइन जारी केली आहेत.

 

प्रमाणपत्र दाखवावे लागेल.
उपनगरीय रेल्वे सेवा ५० टक्के क्षमतेने चालवली जाईल, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका नाही, असे रेल्वेने सांगितले आहे.
याशिवाय प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना कोरोनाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. प्रमाणपत्राशिवाय तुम्ही प्रवास करू शकणार नाही.

 

Web Title :-  Indian Railway New Guidelines | Railway passengers with two doses of vaccination allowed to travel on train from january 10 in tamilnadu

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Employment News | संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी ! 9 क्षेत्रात रोजगार वाढला, ‘ही’ आहे सरकारी आकडेवारी

 

SSC-HSC Exam | शिक्षण विभागाच्या अस्पष्ट सूचना; दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाइन की ऑफलाइन वरून शाळा व्यवस्थापन संभ्रमात

 

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2022 : ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर