खुशखबर ! रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करताना समजणार कोणत्या कोचमध्ये किती ‘सीट’ रिकाम्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. यामध्ये आता तुमचे तिकीट नक्की आहे कि नाही किंवा रिझर्वेशनवर जागा आहे कि नाही किंवा तुमच्या जागांचे वाटप कशाप्रकारे केले जाते यासाठी रेल्वे मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे. त्यामुळे हे बदल कशाप्रकरे केले जाणार आहेत तसेच या नवीन सुविधा काय आहेत याची तुम्हाला आम्ही खाली माहिती देत आहोत.

कोणत्या डब्ब्यात किती जागा शिल्लक
विमानप्रवासाच्या धर्तीवर रेल्वे देखील रिझर्वेशन चार्ट तयार करणार आहे. त्यामुळे प्रवासी प्रवासाच्या चार तास आधीच हा रिझर्वेशन चार्ट पाहू शकणार आहेत. त्यानंतर अर्धा तास अगोदर दुसरा रिझर्वेशन चार्ट प्रकाशित केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना डब्ब्यात किती सीट शिल्लक आहेत याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर कोणत्या कोचमध्ये जागा खाली आहे, हे देखील कळणार आहे, त्यामुळे त्यांना आता जागेसाठी वणवण करावी लागणार नाही.

कन्फर्मेशन ची टक्केवारी
हि सुविधा रेल्वेने मागील वर्षापासूनच उपलब्ध करून दिली आहे. CNF Probability या सुविधेद्वारे तुम्ही तिकीट काढल्यानंतर तुमचे तिकीट नक्की होणार कि नाही याची टक्केवारी सांगत असते. यामुळे प्रवाशांना आपले तिकीट कधी नक्की होईल याची खात्रीशीर माहिती मिळणार आहे.

महाग झाले रेल्वेचे तिकीट
1 सप्टेंबर पासून रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी 20 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत सर्व्हिस चार्ज लावला जाणार आहे. यामुळे रेल्वेच्या तिकीटदरांमध्ये देखील वाढ होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –