खुशखबर ! रेल्वेच्या जनरल तिकीटांसाठी आता रांगेत उभा राहण्याची गरज नाही, मोबाईलवरून करा ‘असं’ बुकिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेकजण रेल्वेने प्रवास करून आपल्या गावाला जात असतात. अशातच रिझर्वेशन नसेल तर अनेकांना जनरल डब्यामध्ये प्रवास करावा लागतो आणि त्यासाठीही मोठ्या रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने एक नवीन अ‍ॅप लॉंच केले आहे. ज्यावरून सहज तिकीट काढत येते आणि रद्द देखील करता येते.

या अ‍ॅपच्या माध्यमातून सिजनल तिकिटांचे रिन्यूअल देखील करता येणार आहे. यासाठी या अ‍ॅपवर जाऊन इ वॉलेट वर जाऊन रिचार्ज करावे लागेल आणि युजर्सची सर्व माहिती भरावी लागेल. या अ‍ॅपचे नाव utsonmobile असे आहे. याला CRIS ने बनवले आहे. हे अ‍ॅप विंडोज आणि अ‍ॅन्ड्रॉईडमध्ये उपलब्ध आहे. युजर्स हे अ‍ॅप प्ले स्टोर आणि विंडोज स्टोअरमधून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतात.

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, पहिल्यांदा या अ‍ॅपमध्ये आपला मोबाइल नंबर, नाव, शहर, रेल्वे टाईप, क्लास, तिकीट टाईप अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि शून्य रक्कम असतानाही सुरु होईल. वॉलेट पुन्हा सुरु करण्यासाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नाही.

R-Wallet ला https://www.utsonmobile.indianrail.gov या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाईन रिचार्ज केले जाऊ शकते. वॉलेटला UTS काउंटरवर देखील रिचार्ज केले जाऊ शकते. कारण हे अ‍ॅप फक्त जनरल तिकिटांसाठी आहे त्यामुळे यामध्ये ऍडव्हान्स तिकीट बुकिंगची सुविधा देण्यात आलेली नाही.

Visit : Policenama.com