भारतीय रेल्वेकडून नवी सुविधा ! चार्ट तयार झाल्यानंतरही मिळणार ‘कन्फर्म’ सीट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल आणि आपल्याला सीटच्या कन्फर्मेशनबद्दल काळजी वाटत असेल तर रेल्वेने आपल्याला मोठा दिलासा दिला आहे. आता भारतीय रेल्वेने आपल्याला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी आणखी एक मार्ग प्रदान केला आहे. रेल्वेच्या या नव्या उपक्रमाचा लाखो प्रवाशांना फायदा होऊ शकतो. भारतीय रेल्वेने ऑनलाइन आरक्षण तक्ता प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे बुक केलेल्या जागा आणि रिक्त जागांची माहिती मिळेल.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले की, ‘आता रेल्वे प्रवाशांना बुकींग जागा आणि बुक न केलेल्या जागांची माहिती सहज मिळू शकेल. एकदा चार्ट तयार झाल्यानंतर त्याची माहिती एका क्लिकवर मिळू शकते.’ दरम्यान, ट्रेन सुरू होण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट जाहीर होईल. यानंतर, दुसरा चार्ट प्रवास सुरू होण्याच्या अर्धा तास आधी जाहीर केला जाईल. या दुस-या चार्टच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेनच्या सीट वाटपाची माहिती मिळू शकेल.  ई – तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्मच्या दोन्ही वेब आणि मोबाइल आवृत्तीमध्ये दिसून येईल.

या प्रमाणे तपासा चार्ट :
यासाठी पहिल्यांदा आपल्याला आयआरसीटीसी वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर, आपल्याला चार्ट किंवा रिक्त स्थानाचा पर्याय दिसेल. आता तुम्हाला रेल्वे क्रमांक, प्रवासाची तारीख, बोर्डिंग स्टेशन यासारख्या प्रवाशाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर गेट ट्रेन चार्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला चार्ट दिसेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like