परिपत्रकातून संकेत ? ऑगस्टपर्यंत सुरू होणार नाही सामान्य रेल्वेसेवा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण बघता अजूनही काही राज्य-शहरात लॉकडाऊन लागू आहे. पण यादरम्यान सर्वांना ट्रेनसेवा कधी सुरू होणार असा प्रश्न पडला आहे. रेल्वेची सामान्य सेवा कोविड-१९ मुळे सुमारे ३ महिन्यांपासून बंद आहे.

मात्र आता ही सेवा पुन्हा पहिल्यासारखी सुरु होण्याची शक्यता दिसत आहे. रेल्वेने १४ एप्रिल आणि त्याअगोदर केल्या गेलेल्या सर्व नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. प्रवाशांना या बुकिंगचा पूर्ण रिफंड दिला जाणार आहे. सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठी आणखी बराच कालावधी जाणार असल्याचे रेल्वेचे स्पष्ट मत आहे.

का होणार उशीर ?
एका वृत्तसंस्थेनुसार, रेल्वेने सोमवारी सर्व झोनसाठी एक परिपत्रक जारी करत १४ एप्रिल रोजी किंवा त्याआधी बुक केलेल्या सर्व गाड्यांचे बुकिंग रद्द केले जाईल आणि पूर्ण रिफंड दिला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सामान्य रेल्वेसेवा साधारण ऑगस्ट मध्यापर्यंत सुरू होणार नाहीत, अशी दाट शक्यता आहे.

सोमवारी जारी करण्यात आले आदेश
भारतीय रेल्वेची वेबसाइट IRCTC नुसार, भारतीय रेल्वेकडून सिस्टिमध्ये ट्रेनचे तिकीट रद्द झाल्यानंतर ऑटोमेटिक पूर्ण रिफंड दिला जाईल. या दरम्यान भारतीय रेल्वे तात्कालिक प्रवासासाठी २३० IRCTC स्पेशल ट्रेन्स विशिष्ट मार्गांवर चालू ठेवतील. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता भारतीय रेल्वेने १५ एप्रिलपासून नियमित ट्रेनचे आगाऊ आरक्षण रद्द केले असताना २५ मार्चपासून देशातील रेल्वेसेवा बंद आहेत.

मात्र १२ मे पासून रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी स्पेशल रेल्वेसेवा सुरू केली होती.