होय, नागपूर रेल्वे स्टेशनवर दररोज 166 कर्मचारी उंदरांना पकडण्यासाठी ‘तैनात’, 1.45 लाखाचा खर्च

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील एक रेल्वे स्टेशन असे आहे जेथे उंदरांच्या समस्यामुळे सर्व प्रवाशी हैराण होतात. त्यामुळे तेथे उंदिर पकडण्यासाठी 166 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर उंदीर पकडण्यासाठी रोज 1.45 लाख रुपये खर्च येतो. हा येणार खर्च पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. भारतीय रेल्वे सेंट्रल झोनचे नागपूर स्टेशन या गंभीर समस्येमुळे हैराण आहे. मागील 2 वर्षांपासून या स्टेशनवर उंदरांची समस्या सोडवण्यासाठी 10.56 कोटी रुपये खर्च झाला आहे. आरटीआयवर मिळालेल्या उत्तरात हा खुलासा झाला.

उंदरांमुळे नागपूर रेल्वेस्टेशनचे तीन तेरा –
देशभरातील स्टेशनवर असलेल्या उंदरांचा हैदोस कोणापासून लपलेला नाही. भारतीय रेल्वेचे असे एखादे रेल्वे स्टेशन असेल जेथे उंदरांवर खर्च होत नसेल. चेन्नई डिवीजन द्वारे एक उंदीर पकडण्यावर जवळपास 22 हजार रुपये खर्च येत असल्याचा खुलासा झाला होता. परंतू राज्यातील नागपूर रेल्वे स्टेशनची परिस्थिती चेन्नईतील परिस्थिती पेक्षा जास्त वाईट आहे. यामुळे नागपूर रेल्वे स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उंदरांची मोठी समस्या उद्भवते.

सकाळपासून संध्याकाळ पर्यंत 166 कर्मचारी पकडतात उंदीर –
नागपूर डिवीजन ऑफिसने आयटीआर मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, नागपूर रेल्वे स्टेशनवर 8 प्लॅटफॉर्म, 10 ट्रॅक तसेच अनेक ऑफिसेस देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी उंदरामुळे होणाऱ्या नुकसानामुळे सर्वच त्रस्त आहेत, त्यामुळे रोज काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. प्लॅटफॉर्म नंबर एकवर 10 कर्मचारी आहेत तर याशिवाय 2 – 3 वर 9 कर्मचारी आणि 6-7 वर 8 कर्मचारी आहेत. तर ट्रॅक नंबर 1 – 4 वर 10 आणि 5-6 वर 9 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1.45 लाख रुपये रोजचा खर्च –
रेल्वे स्टेशनवर रोज प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅक आणि ऑफिसमध्ये देखील उंदीर पाहिले गेले आहेत, उंदिर पळवण्यासाठी रोज मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. सर्वात जास्त खर्च प्लॅटफॉर्म नंबर एक वर 12,137 रुपये खर्च येतो. याप्रकारे दुसऱ्या प्लॅटफॉर्म, ट्रक आणि ऑफिसमध्ये उंदिर पळवण्यावर मोठा खर्च केला जातो. आयटीआरमध्ये मिळालेल्या उत्तरात मागील 2 वर्षात म्हणजेच 730 दिवसात नागपूर स्टेशनवर उंदरांपासून मुक्तता मिळवण्यासाठी 10.56 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी