30 जून पर्यंत ‘या’ गोष्टींवर रेल्वेकडून कुल्याही प्रकारचा ‘चार्ज’ नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या प्रगती आणि वेगाला भारतीय रेल्वेची मोठी साथ लाभली आहे. त्यामुळेच आता रेल्वेने देशाच्या अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी मालगाड्यांच्या भाड्यात सवलत देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे रेल्वे द्वारे माल वाहतूकीला प्रोस्ताहन मिळल तर देशातील व्यापाऱ्यांना देखील याचा फायदा मिळेल. रेल्वेने 1 ऑक्टोबरपासून 30 जून दरम्यान लावण्यात येणाऱ्या 15 टक्के सीजन चार्जला आयरन आणि पेट्रोलियम सोडून बाकी सर्व कमोडिटीज रद्द केल्या आहेत. रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी ट्विट करत सांगितले की आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वेद्वारे मालभाड्यात सवलत देण्यास सुरुवात केली आहे.

कंटेनर ट्रॅफिकवर राउंड ट्रिप चार्ज ची घोषणा –
रेल्वेने रिकामे कंटेनर आणि बोग्याचा वापर करण्याला प्रोस्ताहन देण्यासाठी 25 टक्के सूट देण्याची घोषणा दिली आहे. हे पाऊल इतर परिवहन माध्यमांच्या तुलनेत रेल्वेसाठी आधिक आकर्षक बनवेल.

रेल्वेने विविध कमोडिटीजच्या माल भाड्यात कपात केली आहे. त्या विविध कमोडिटीजचे कंटेनर क्लास रेट आणि फ्रेट ऑल काइंडचा समावेश आहे.

याआधी सरकारने डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर तयार करण्याची घोषणा केली होती. यावर काम सुरु आहे. फ्रेट कॉरिडोरने मालगाड्यांचा स्पीड वाढेल ज्यामुळे दिल्ली – हावडा रेल्वे ट्रॅकवर मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट रेल्वेच्या गतीत वाढ होईल. कॉरिडोरच्या निर्माणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधार होईल. 2022 पर्यंत दिल्ली ते हावडापर्यंत कॉरिडोरचे कार्य पूर्ण करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.

हा कॉरिडोर पूर्ण झाल्यानंतर मालगाड्याचा वेग 100 किलोमीटर प्रति तास होईल. ज्यामुळे रेल्वेच्या माल भाड्यात वाढ होईल. तर दिल्ली – हावडा रेलखंडवर मेल, एक्सप्रेस व सुपरफास्ट रेल्वेच्या संचालनात सुधार होईल.

Visit : Policenama.com