Indian Railway | बेरोजगार सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना, 50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण; ‘या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railway | भारतीय रेल्वे (Indian Railway) देशातील बेरोजगार तरूणांसाठी प्रशिक्षणाची खास योजना (special training scheme for unemployed youth) तयार केली आहे. या अंतर्गत 50 हजार तरूणांना वेगवेगळ्या प्रकारच्या 4 ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर तरुण आपल्या क्षेत्रात रोजगार मिळवू शकतात. या योजनेचे नाव कौशल्य विकास योजना (Railway Skill Development Scheme) आहे.

योजनेच्या अंतर्गत तरूणांना फिटर (fitter), वेल्डर (welder), इलेक्ट्रीशियन (electrician) चे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर त्यांना नोकरी मिळवणे सोपे जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला रेल्वेने कौशल्य विकास योजनेची सुरुवात केली आहे.

75 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम
रेल्वे कौशल्य विकास योजनेंतर्गत देशातील वेगवेगळ्या 75 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार आहे. या प्रशिक्षणामुळे तरूणांना रोजगार मिळवण्यात मदत मिळेल. हे प्रशिक्षण मोफत आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना सर्व सुविधा दिल्या जातील.

सुरूवातीला 1000 तरूणांची निवड
देशातील 50 हजार तरूणांना जवळपास 100 तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट दिले जाईल. 18 ते 35 वर्षाचे तरूण या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. मात्र हे लक्षात ठेवा की, रेल्वेचा हा दावा नाही की कौशल विकास योजनेच्या प्रशिक्षणानंतर तरुणांना रेल्वेत नोकरी मिळेल. रेल्वे तरुणांना रोजगारासाठी तयार करेल. सुरूवातीला 1000 तरूणांची निवड होईल. तीन वर्षात 50 हजार तरूणांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

भविष्यात आणखी ट्रेड वाढतील
सध्या प्रशिक्षणासाठी चार ट्रेड असून यामध्ये भविष्यात आणखी वाढ होईल. यामध्ये इंस्ट्रूमेंटेशन, सिंगलिंग, काँक्रीट मिक्सिंग, रोड वेंडिंग, काँक्रीट टेस्टिंग, इलेक्ट्रॉनिक कार्ड रिप्लेसमेंट सारखे प्रशिक्षण दिले जाईल.

 

कौशल्य विकास योजनेची वैशिष्ट्ये

हायस्कूलच्या गुणांच्या मेरिटवर ट्रेनिंगसाठी निवड होईल.

यामध्ये कोणतेही आरक्षण लागू नाही.

प्रशिक्षणात 75 टक्के हजेरी अनिवार्य आहे.

Advt.

प्रशिक्षण कालावधी 100 तास किंवा 3 आठवडे आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत किमान 55 टक्के आणि प्रॅक्टिकलमध्ये किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत.

–  मोफत प्रशिक्षण आहे, परंतु उमेदवाराला राहणे, खाणे-पिणे आणि प्रवासाचा खर्च स्वता करावा लागेल.

ही कागदपत्रे आवश्यक
या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल.

Web Titel :-  

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 8,326 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | गरुड गणपती आणि गजानन मंडळ पालखीतून विसर्जन मिरवणूक

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कसे मिळाले सचिन वाझेकडून 4.7 कोटी?, न्यायालयात झाला खुलासा