Indian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल रेल्वेत 1664 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Railway Recruitment 2021 | रेल्वेने अप्रेंटिसच्या 1664 पदांवर भरती काढून अर्ज मागवले आहेत. सोमवारपासून या (Indian Railway Recruitment 2021) पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे सर्टिफिकेट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण या पदांवर मेरिटच्या आधारावर भरती केली जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे रिक्रूटमेंट सेलने निवडलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट जारी करेल.

अनेक डिव्हिजनमध्ये होईल नियुक्ती

अप्रेंटिसची ही पदे वेगवेळ्या डिव्हिजनमध्ये काढली आहेत.

रेल्वेच्या अ‍ॅडनुसार, प्रयागराज डिव्हिजनमध्ये 364

झांसी डिव्हिजनमध्ये 480

झांसी वर्कशॉपमध्ये 185

आग्रा डिव्हिजनमध्ये 296

पदांवर भरती होईल. कॅटेगरीनुसार पाहण्यासाठी वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकता.

भरतीच्या महत्वाच्या तारखा

आरआरसी नॉर्थ सेंट्रल रेल्वेनुसार या पदांवर योग्य उमेदवार 2 ऑगस्ट 2021 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख सुद्धा 1 सप्टेंबर आहे.

 

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा

हायस्कूलमध्ये 50% गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास केलेले तरूण अर्ज करू शकतात. आयटीआय सर्टिफिकेट एनसीव्हीटीद्वरे प्रमाणित असावे. वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष आहे.

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी 100 रुपये आहे. तर एससी-एसटी आणि महिलांसाठी अर्ज शुल्क नाही.

असा करा अर्ज

अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करण्याची लिंक 2 ऑगस्ट 2021 ला अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम रेल्वे रिक्रूटमेंट सेल नॉर्थ सेंट्रल रेल्वेची वेबसाइट https://ncr.indianrailways.gov.in वर जा. येथे तुम्हाला या भरतीची जाहिरात आणि अ‍ॅप्लिकेशन फॉर्म लिंक मिळेल. येथील स्टेप्स फॉलो करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

 

Web Title : indian railway recruitment 2021 apprentice job in north central railway for 1664 posts last date notification

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, प्रचंड खळबळ

Indian Railways News | RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास न केल्यास तिकिटाचे पैसे IRCTC परत करते का?, जाणून घ्या रेल्वेचे नियम

Anti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ