Indian Railway Recruitment 2021 | खुशखबर ! भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – Indian Railway Recruitment 2021 | लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण- तरुणी नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत पश्चिम रेल्वेने (Western Railway) नोकरीच्या संधी (Job opportunities) उपलब्ध करून दिल्या आहेत. Indian Railway Recruitment 2021. यात नर्सिंग (Nursing) स्टाफ पदासाठीची भरती होणार आहे. इच्छुकांनी नोकरीसाठी अर्ज पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर wr.indianrailways.gov.in दाखल करावा. पश्चिम रेल्वे भरती प्रक्रियेसाठीची प्रत्यक्ष प्रकट मुलाखत फेरी 21 जून 2021 ला होणार असून उमेदवारानी उपस्थित राहणे गरजेचे आहे. वडोदरा कोविड डिव्हीजनमध्ये पूर्णवेळ 3 महिन्यांच्या कंत्राटी करारान्वये पॅरामेडिकल विभागाअंतर्गत 18 जागा भरण्यात येणार आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पद भरतीची माहिती

पद –           स्टाफ नर्स
रिक्त जागा- 18
पगार-         Rs 44900

पात्रता

नोकरीसाठी अर्जदाराकडे नोंदणीकृत नर्सिंगचे प्रमाणपत्र असावे. तसेच जनरल नर्गिंगमध्ये 3 वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा ?

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी निर्धारित ठिकाणी पोहचावे. सोबत येताना नोकरीसाठीचा अर्ज (फॉर्म) आणि अटेस्टेड कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि त्यांच्या मुळ प्रती आणाव्यात.

मुलाखतीचा दिवसः 21 जून

मुलाखतीची वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 5

नोंदणीसाठीची वेळ : सकाळी 9 ते दुपारी 12

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : indian railway recruitment 2021 good news government job vacancies for staff nurse know about it

हे देखील वाचा

दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना

Ajit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा