रेल्वेत झोपण्याची वेळ बदलली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण रेल्वेमध्ये झोपण्याची वेळ बदलण्यात आली आहे. जुन्या नियमांनुसार प्रवासी रात्री 9 नंतर सकाळी 6 पर्यंत रेल्वेत आपल्या बर्थवर झोपू शकत होते. परंतू या वेळेत आता 1 तासाची कपात करण्यात आली आहे. आता प्रवासी रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत झोपू शकतील. हा नवा नियम त्या सर्व रेल्वेना लागू होईल ज्यात झोपण्याची सुविधा आहे.

रेल्वेने रोज 2 कोटीच्या जवळपास प्रवासी प्रवास करतात. परंतू अनेकांना रेल्वेसंबंधित नियमांची जास्त माहिती नसते. ज्यामुळे त्यांना अनेकदा अडचणी येतात. परंतू तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

लोवर बर्थ वाल्या प्रवाशांना 1 तास कमी मिळणार झोप –
रेल्वेच्या नियमांनुसार आरक्षित डब्यांच्या लोवर बर्थ सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत बसण्याची नियम निश्चित करण्यात आला आहे आणि रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

मिडल बर्थवर झोपण्याचे नियम –
रेल्वेत झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 करण्यात आली आहे. यानंतर कोणीही हा नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. झोपेचा कालावधी संपल्यानंतर मिडल बर्थ खाली करणे आवश्यक आहे.

वेटिंग – आरसी असलेल्यांना दिलासा –
झोपण्याची वेळ निश्चित करण्याचा सर्वात अधिक फायदा वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांना झाला आहे. अशांना खालील असनांवर प्रवास करणाऱ्यांना आरक्षित तिकिट असलेले प्रवासी आपल्या असनावर बसू देत नाहीत. असे प्रवासी आता या असनांवर बसू शकतीत.