भारतीय रेल्वेची RO-RO सुविधा खुपच फायदेशीर, लवकरच ‘या’ मार्गावर होणार सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये भारतीय रेल्वेने कोकणातून रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) ट्रेन सेवेची यशस्वी ट्रायल पूर्ण केली. या मार्गावर दोन बोगदे पडत असूनही यशस्वीरित्या ट्रायल रन पूर्ण झाला आहे. या मार्गावर लवकरच रो-रो सेवा सुरू करता येईल, असा विश्वास आहे.

दोन ट्रक घेऊन जाणारी ट्रेन कर्नाटकातील सुरथकल रेल्वे स्टेशनवरून सकाळी 7 वाजता सुरु झाली आणि कोझिकोडच्या पश्चिम हिल ला दुपारी 2.50 वाजता पोहोचली. दक्षिण रेल्वेच्या एका निर्देशानुसार, ही ट्रेन शोरनूर आणि तिरुअनंतपुरम डिव्हिजनमध्ये टेस्ट रन करेल. रो-रो मॉडेल आतापर्यंत खूप उपयुक्त सिद्ध झाले आहे. कारण यामुळे इंधन आणि वेळेची बचत होते. तसेच, ट्रक कंपनीचा खर्च कमी करतो.

कोकण रेल्वेने 1999 मध्ये रो-रो सेवा सुरू केली होती. या दरम्यान कोकण रेल्वेने 4 लाखाहून अधिक लोडेड ट्रक वाहून नेल्या आहेत. मुंबईपासून जवळपास 145 किमी अंतरावर कोलाडपासून गोव्याच्या वेर्णा स्टेशन (417 किमी) व कोलाड ते सुरथकल स्टेशन (721 किमी) दरम्यान रो-रो सेवा उपलब्ध आहे. रस्त्याद्वारे हे अंतर पार करण्यासाठी ट्रकांना अनुक्रमे 24 आणि 40 तास लागतात. मात्र कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेच्या माध्यमातून हे अंतर अनुक्रमे 12 आणि 22 तासात पूर्ण केले जाते.