लवकरच ‘या’ 600 ट्रेन्समधून प्रवास करता येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व पॅसेंजर ट्रेनसाठी भारतीय रेल्वेकडून लागू होणाऱ्या झिरो-बेस्ड टाईमटेबलमध्ये काही महत्त्वाच्या बाबी असणार असून येणाऱ्या काळात लवकरच नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे की, या नवीन वेळेपत्रकानुसार एकूण 600 मेल/एक्सप्रेस रद्द केल्या जाऊ शकतात.

रेल्वेच्या योजनेनुसार 10 हजार 200 हॉल्ट्स देखील संपुष्टात आणले जातील, तसेच 360 पॅसेंजर ट्रेन्सना मेल किंवा एक्सप्रेसमध्ये कन्व्हर्ट केले जाईल. त्याशिवाय 120 मेल/एक्सप्रेस ट्रेन्सना सुपरफास्ट ट्रेन्सच्या श्रेणीमध्ये अपग्रेड केले जाईल. एका मीडिया आहवालात सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, सध्या रेल्वेकडून या निर्णयाबाबत काम सुरु आहे आणि लवकरच याबाबत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे.

गुरुवारी रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही.के. यादव यांनी सांगितले की, संपूर्ण रेल्वेचे परिचालन पुन्हा सुरळीत सुरु झाल्यानंतर नवीन नियम लागू केले जातील. सध्या कोव्डिड-19 ची परिस्थिती पाहता मी एक निश्चित वेळ सांगू शकत नाही. हे या गोष्टीवर अवलंबून असेल की आपण सामान्य सेवा कधीपासून सुरु करु, असे यादव यांनी म्हटले आहे.

यापूर्वी काही मीडिया अहवालानुसार सांगण्यात आले होते की, नवीन प्रणालीमध्ये पॅसेंजर ट्रेन्सबरोबरच रेल्वेच्या थांब्याची संख्या देखील कमी केली जाणार आहे. रेल्वेद्वारे करण्यात येणाऱ्या या बदलाचा अर्थ असा आहे की, सर्व पॅसेंजर ट्रेन्सचे वेळापत्रक पुन्हा नवीन प्रकारे तयार केले जात आहे.. रेल्वेकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, याकरता आयआयटी मुंबईची मदत घेतली जात आहे. या अंतर्गत मालवाहू ट्रेन्स आणि मेंटेनन्ससाठी वेगळे टाईम स्लॉट देण्यात येणार आहेत.

रात्री उशीरापर्यंत थांबे न ठेवण्याचा प्रयत्न

रेल्वेच्या या नव्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठ्या परिवहन सेवेला आर्थिक फायदा होईल आणि खर्चही कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अलिकडच्या काळात रेल्वेला मोठे नुकसान झाले असून रेल्वे आपला महसूल वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, झिरो-बेस्ड वेळापत्रकांमध्ये रात्री उशीरा गैरसोयीच्या वेळेस गाड्यांचे थांबे असणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयी साठी रेल्वेकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.