आता रेल्वेमध्ये देखील मिळणार WiFi ची सुविधा, मादी सरकारचा ‘हा’ नवा प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेत लवकरच प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा मिळणार असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. गोयल यांनी याबाबत बोलताना सांगितले कि,भारतातील 5150 रेल्वे स्टेशनवर हि सुविधा उभारली जाणार आहे. पुढील वर्षीच्या शेवटपर्यंत आम्ही भारतातील सर्व म्हणजे 6500 स्टेशनवर वायफाय बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रेल्वेच्या आतमध्ये वायफाय उपलब्ध करून देण्यासंदर्भात गोयल यांनी म्हटले कि, हा एक गुंतागुंतीचा मुद्दा असून चालत्या रेल्वेत हि सुविधा देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. यासाठी काही टॉवर्स लागणार असून, काही उपकरणे देखील लागणार आहेत. यासाठी विदेशी टेक्‍नोलॉजी आणि गुंतवणूकदारांची मदत घेतली जाणार आहे.

रेल्वेच्या डब्ब्यात लागणार CCTV
यासंदर्भात बोलताना गोयल म्हणाले कि, यामुळे सुरक्षेची देखील हमी मिळणार असून याची माहिती थेट रेल्वे पोलिसांना मिळणार आहे. पुढील चार पाच वर्षात आम्ही हि सुविधा सुरु करणार आहे.

खासगी भागीदारांद्वारे रेल्वेचे आधुनिकीकरण
गोयल यांनी सांगितले कि, आम्ही खासगी भागीदारांद्वारे रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भोपाळच्या हबीबगंज स्टेशनचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले कि,हे स्टेशन सर्व सुविधांयुक्त करण्यात येणार असून आणखी 12 ते 13 स्टेशन देखील अशा पद्धतीने तयार केले जाणार आहेत. यामध्ये घरे, व्यावसायिक दालने आणि शॉपिंग मॉल देखील बांधले जाणार आहेत. यामुळे रेल्वेचे उत्त्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर रेल्वे पुढील चार ते पाच वर्षांत पूर्णपणे इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर धावणार असून रेल्वेच्या जमिनीवर देखील इंडस्ट्रियल पार्क उभारण्यावर काम चालू आहे.

Visit : Policenama.com