1 जून पासून 200 रेल्वे गाड्या धावणार, ‘हे’ नियम जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउननंतर सुमारे दोन महिन्यानंतर रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून 200 रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याआधीपासून धावणार्‍या श्रमिक रेल्वे आणि 30 स्पेशल एसी गाड्यांव्यतिक्त 200 गाड्या 1 जूनपासून धावणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत. जनरल कोचमध्ये बसण्याकरता देखील आरक्षण करणे आवश्यक असणार आहे. कोणताही अनारक्षित कोच या गाड्यांमध्ये असणार नाही.

अशी आहे व्यवस्था
– रेल्वे गाड्यांमध्ये तिकिट तपासणारा आणि रेल्वेचा स्टाफ देखील पीपीई किट, ग्लोव्ह्ज आणि मास्क घालून असणार आहे. तिकिट तपासण्यासाठी त्यांच्याकडे मॅग्निफायिंग ग्लास असणार आहे
– सर्व 230 रेल्वे गाड्यांसाठी आगाऊ बुकिंगचा कालावधी 30 दिवसांवरून 120 दिवस केला आहे
– तात्काळ बुकिंग आधीप्रमाणेच सामान्य करण्यात आले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकावर आधारित आहे.
– कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता रेल्वेने असे आवाहन केले आहे की गरोदर महिला, 10 वर्षांखालील लहान मुलं आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक यांनी रेल्वे प्रवास करू नये. अति अत्यावश्यक परिस्थितीमध्येच त्यांना प्रवास करता येईल
– रेल्वेने आरक्षण काऊंटरवर तिकिटांचे बुकिंग आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस, आयआरसीटीसी यांसारख्या अन्य पर्यायांचा वापर करून देखील तिकिट बुक करता येणार आहे.