रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय,चालत्या रेल्वेमध्ये आता होणार नाही आगीचा वापर ‘या’ पद्धतीने मिळणार प्रवाशांना जेवण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चालत्या ट्रेनमधील होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दक्षिण पूर्व भागातील रेल्वे गाड्यांमध्ये आता बिना विस्तवाशिवाय चालणाऱ्या इलेट्रॉनिक शेगड्या वापरल्या जाणार आहेत. यामुळे यात्रेकरूंना रेल्वेमध्ये चहा आणि दुध गरम करून मिळणार आहे आणि प्रवाशांनी दिलेली जेवणाची ऑर्डर त्यांना पुढील स्टेशनवरती गेल्यावर मिळणार आहे.
या निर्णयामुळे रेल्वेमध्ये आग लागण्यासारख्या ज्या काही दुर्घटना होत आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे. एलएचवी कोचमध्ये पहिल्यापासूनच ही व्यवस्था आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की यासंबंधीचा आदेश बोर्डाकडून आलेला आहे आणि तसे कामही सुरु करण्यात आलेले आहे.

बेस किचनच्या माध्यमातून भेटणार जेवण
चालत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना आता बेस किचनच्या माध्यमातून गरम जेवण मिळणार आहे. आइआरसीटीसी ठराविक अंतरावर सेंट्रल किचन बनवत आहे. त्या ठिकाणी जेवण तयार होणार आणि मग ते प्रवाशांना मिळणार. रेल्वेमध्ये अ‍ॅप आणि वेबसाईट वरून जेवणाची ऑर्डर देण्याची पद्धत सध्या वाढत आहे

आरोग्यविषयक वृत्त