Alert ! रेल्वेने प्रवास करताय तर ‘ही’ चूक करू नका, अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच मागील काही काळापासूनही रेल्वेमध्ये आग लागल्याचं घटना वाढत असतानाच यावरून रेल्वे प्रशासनाने एक नियमावली तयार केली आहे. तर रेल्वेने प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ घेऊन स्वत: प्रवास करू नका आणि इतरांनाही करू देऊ नका. हा गुन्हा आहे, असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई आणि थेट तुरुंगात जाण्याची शक्यता आहे असे पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे सूचना केली आहे.

कोट्यावधी लोक रेल्वेने दररोज प्रवास करतात. लांबच्या प्रवासासाठी लोक रेल्वेने जात असतात. तर रेल्वेत खासगी मालमत्ता आणि सरकारी मालमत्तेचेही प्रचंड नुकसान होते. या घटनांमध्ये बऱ्याचदा प्रवाश्यांचीही चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जर एखादा प्रवासी रेल्वेमध्ये धुम्रपान करताना आढळून आल्यास त्याची तुरुंगात रवानगी करण्यात येईल असे सांगण्यात आले. तर रेल्वेने प्रवास करताना केरोसिन (रॉकेल), सुकलेला चारा, स्टोव्ह, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, काडीपेटी, फटाके यासारख्या आग पसरवणाऱ्या ज्वलनशील पदार्थांची ने-आण करणे गुन्हा आहे. हे पदार्थ सोबत घेऊन प्रवास करू नका, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. यामुळे तुम्ही स्वत:चा आणि इतर प्रवाश्यांचाही जीव धोक्यात घालत असल्याचा इशारा सुद्धा रेल्वेने दिलाय.

दरम्यान, आग पसरवणाऱ्या या ज्वलनशील पदार्थांना सोबत घेऊन रेल्वेने प्रवास करणे रेल्वे अधिनियम १९८९, कलम १६४ नुसार गुन्हा आहे. या पदार्थांसोबत पकडले गेल्यास आरोपीला ३ वर्षांपर्यंत शिक्षा किंवा १ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर तसेच रेल्वे परिसरामध्ये धुम्रपान करण्यासही मनाई असून असे आढळून आल्यास त्या व्यक्तीकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो, असे रेल्वेने सांगितले आहे.