Indian Railways ने आज रद्द केल्या अनेक ट्रेन, महाराष्ट्रातील रेल्वे वाहतुकीवरही होणार परिणाम

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने नवीन कृषी कायद्याविरोधात मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेने सांगितले की, 25 डिसेंबर 2020 ला काही ट्रेन रद्द, काही अशंत: रद्द आणि अनेक ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनामुळे हरियाणा आणि पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक वाईट प्रकारे प्रभावित झाली आहे.

रेल्वेने या ट्रेन केल्या पूर्णपणे रद्द
भारतीय रेल्वेने दरभंगा ते अमृतसरला जाणारी स्पेशल ट्रेन क्रमांक 05211 रद्द केली आहे. तर परतीच्या प्रवासात अमृतसरहून दरभंगाला जाणारी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन क्रमांक 05212 27 डिसेंबरला रद्द राहील. तर, 25 डिसेंबरला सियालदहाहून अमृतसरला जाणारी स्पेशल ट्रेन क्रमांक 02379 रद्द राहील. यामुळे परतीच्यावेळी जाणारी ट्रेन क्रमांक 02380 अमृतसरहून सियालदहा एक्सप्रेस स्पेशल 27 डिसेंबरला 2020 ला धावणार नाही.

या सर्व ट्रेनचा रूट आज राहिल डायव्हर्ट

* नांदेड-अमृतसर (02715), अमृतसर-नांदेड (02716) अंशता रद्द राहील. सोप्या शब्दात सांगायचे तर नांदेडहून ही ट्रेन दिल्लीपर्यंत चालेल. यानंतर 27 डिसेंबरला नवी दिल्लीहूनच चालेल.

* रेल्वेने सांगितले की, कोरबाहून अमृतसरला जाणारी ट्रेन क्रमांक 08237 आज अंबालापर्यंतच जाईल म्हणजे ट्रेन अंशता रद्द राहील.

* अमृतसर ते कोरबा धावणारी स्पेशल ट्रेन 08238 अंबालाहूनच 27 डिसेंबरला चालेल. अंबाला ते अमृतसर आणि अमृतसर ते अंबालामध्ये तिचे संचालन रद्द राहील.

* न्यू जलपाईगुडी ते अमृतसर दरम्यान धावणारी स्पेशल ट्रेन 04653 आज सहारनपुरपर्यंत धावेल. या ट्रेनचे संचालन सहारनपुर ते अमृतसर दरम्यान रद्द राहील.

* रेल्वेने अमृतसर-मुंबई सेंट्रल (02904), बांद्रा टर्मिनस-अमृतसर (02925), अमृतसर-जयनगर (04652), अमृतसर-बांद्रा टर्मिनस (02926), जयनगर-अमृतसर (04651) आणि जयनगर-अमृतसर (04649) चा रूट डायव्हर्ट केला आहे.