Coronavirus Impact : यात्रीगण ध्यान दें ! ‘कोराना’च्या पार्श्वभुमीवर रेल्वेनं 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन सर्व्हिसेस केल्या बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढली असून ती आता 341 पर्यंत पोहचली आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढू शकते त्यामुळं भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणजेच देशात 31 मार्चपर्यंत रेल्वे धावणार नाही. कोरोनाच्या संक्रमणापासून सर्वसामान्य जनतेचा बचाव व्हावा म्हणून रेल्वेनं हे मोठं पाऊल उचललं आहे. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते आणि अशा परिस्थितीत प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यापुर्वी शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान सर्व प्रवाशी रेल्वे जनता कर्फ्यूमुळं बंद होत्या.

दरम्यान, उपनगरीय रेल्वे सेवा अंशतः आणि कोलकता मेट्रो आज रात्रीपर्यंत चालू राहतील असेही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.